आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात अद्यार चित्रपटगृहे सुरु न झाल्याने अभिनेत्री राणी मुखर्जीचे दोन बिग बजेट चित्रपट आता यावर्षी नव्हे तर पुढील वर्षी रिलीज होणार असल्याचे समजते. 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे' आणि 'बंटी और बबली -2' हे तिचे दोन आगामी चित्रपट आहेत. 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे' या चित्रपटाचे शूटिंग फिनलँडजवळील एस्टोनियामध्ये 30 ते 40 दिवस केले गेले आहे.
निर्माता निखिल आडवाणी यांच्या मते, "बहुतेक चित्रीकरण हे एस्टोनियामध्ये झाले आहे. आता फक्त 10 ते 12 दिवसांचे शूटिंग शिल्लक आहे. आम्ही ते मुंबईत पूर्ण करू. शूटिंग नीट पूर्ण झाले आहे. कोणालाही कोविड संसर्ग झाला नाही. लसीकरणामुळे, अशा प्रकारचा धोका खूप कमी झाला आहे."
राणी मुखर्जीचे दोन्ही चित्रपट नवीन वर्षातच प्रदर्शित होतील
दुसरीकडे, ट्रेड जाणकारांच्या मते, राणी मुखर्जीचे दोन्ही चित्रपट नवीन वर्षातच येतील. कारण महाराष्ट्रात अद्याप थिएटर उघडले नाहीत. जर ऑक्टोबरपूर्वी महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली, तर यावर्षी दोनपैकी फक्त एक चित्रपट प्रदर्शित होईल. कारण 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे'चे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये दोन ते अडीच महिने लागतील. जर महाराष्ट्र सर्किट ओपन झाले तरच 'बंटी और बबली 2'वर निर्माते यावर्षी विचार करू शकतात. कारण कमी प्रेक्षक संख्येमुळे निर्मात्यांना चित्रपटावर फ्लॉपचा शिक्का लावायचा नाहीये.
'बंटी और बबली 2' मध्ये 7 ते 8 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे राणी
'बंटी और बबली 2'च्या जवळच्या एका सूत्राने सांगितले, "सैफ-राणीच्या पात्राचे सिद्धांत आणि शर्वरीसोबत गुरू-शिष्याचे नाते आहे. सिद्धांत आणि शर्वरीलाही बंटी आणि बबलीसारखे व्हायचे आहे. यावेळी ते भारताबाहेर अबुधाबीमध्ये ठग असतील. चित्रपटातील मेक-अप विभागावर कामाचा दबाव जास्त होता. कारण चारही अभिनेत्यांची पात्रे वेषांतर करुन त्यांचे मिशन पार पाडतात. अशा प्रकारे ते सर्व जण सात ते आठ वेगवेगळ्या लूकमध्ये चित्रपटात दिसणार आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.