आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील घराणेशाही:77 वर्षीय रणजीत म्हणाले - पूर्वीही असे घडत होते, 'सिलसिला'मध्ये परवीन बाबीला काढून जया बच्चनला देण्यात आली होती भूमिका 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणजीत म्हणाले- मी कोणत्याही गटात नव्हतो परंतु सर्वांशी चांगले संबंध होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम , फेव्हरटिझम, कॅम्पचे वर्चस्व आणि गटबाजी यासारख्या मुद्द्यांना उधाण आले आहे. यावरील वादविवाद थांबत नाहीयेत. अनेक सेलिब्रिटी या विषयावर आपले मत व्यक्त करीत आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळत चालली आहे. 

या यादीमध्ये आता गतकाळातील प्रसिद्ध व्हिलन रणजीत यांचेही नावही जोडले गेले आहे. एका मुलाखतीत त्यांनी या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

77 वर्षीय रणजीत यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, 'घराणेशाही आणि प्रतिस्पर्धी पुर्वीपासूनच आहे. मला आठवतंय की, परवीन बाबीला सिलसिला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात येणार होते, पण निर्मात्यांना परवीन बाबीपेक्षा जया बच्चन भूमिकेत जास्त शोभून दिसतील असे वाटले, त्यानंतर परवीन बाबीला काढून जया बच्चन यांना कास्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शोले चित्रपटातील भूमिका सर्वप्रथम डॅनी यांना ऑफर करण्यात आली होती पण ते व्यस्त असल्याने त्यांनी तो रोल नाकारला होता. त्यानंतर मला ती भूमिका ऑफर करण्यात आली, मात्र ते माझे चांगला मित्र होते म्हणून मी ही भूमिका नाकारली. यानंतर, दुसर्‍या कुणाला रोल मिळाला. तर, अशा गोष्टी घडतच राहतात. मी कोणत्याही गटात नव्हतो परंतु सर्वांशी चांगले संबंध होते. मला सर्वांकडून खूप प्रेम मिळाले', असे रणजीत म्हणाले. 

  • मुलगा देखील बॉलिवूडमध्ये प्रवेश करेल

रणजीत यांनी या मुलाखतीत सांगितले की, त्यांचा मुलगा चिरंजीवदेखील बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. ते म्हणाले, 'मुलगा येईल. तो तयारी करीत आहे आणि मी त्याच्या आवडीमध्ये जास्त हस्तक्षेप करत नाही. तो माझ्यापेक्षा हुशार आहे.'

  • रणजीत यांना आठवला भूतकाळ  

या मुलाखतीत रणजीत यांनी गतकाळाची आठवण झाली. ते म्हणाले, 'त्या काळात उन्हाळ्यात शूटिंग करताना कलाकारांना खूप अडचणी यायच्या. त्यावेळी कलाकार व्हॅनिटी व्हॅन शेअर करायचे आणि सर्व एक कुटुंब सारखे होते. मला कामात खूप आनंद मिळायचा. प्रत्येक शूटनंतर अभिनेते माझ्या घरी यायचे. धर्मेंद्र असो, जितेंद्र असो वा विनोद खन्ना, सर्वजण माझ्या घरी यायचे. आम्ही एकत्र बसून जेवायचो, बरीच चर्चा करायचो आणि बॅडमिंटनही खेळायचो.

'रीना रॉय पराठे बनवत असत आणि मौसमी चटर्जी मासे बनवत असत. सेटवरही कलाकार एकमेकांसोबत सीनविषयी चर्चा करत असत. त्या वेळी लेखकांनाही बरेच महत्त्व दिले जात होते. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे, याकाळात मी त्या सर्व गोष्टी खूप मिस करतो.'