आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एक संधी:'रामायण' फेम दीपिका चिखलियांच्या चित्रपटात रानू मंडल गाणार गाणं, हा आहे चित्रपट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिका यांनी रानू मंडल यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एका रात्रीतून प्रसिद्धीझोतात आलेल्या रानू मंडल यांना बॉलिवूडमध्ये आणखी एक संधी मिळाली आहे. 'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया ब-याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून 'सरोजिनी' हे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका या सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

दीपिका यांनी ट्विट करत दिली माहिती
लॉकडाऊन काळात हालाखीची परिस्थिती ओढवलेल्या रानू मंडल यांना दीपिका यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. दीपिका यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘माझा चित्रपट सरोजिनी या मधील धीरज मिश्रा यांनी लिहिलेले गाणे रानू मंडल गाणार आहेत’ या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, दीपिका यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात रानू मंडल यांनी गाण्याच्या काही ओळी गात, तुम्ही मला जे प्रेम आणि आदर आधी दिला. तसेच, यावेळीही द्याल, अशी आशा, असे म्हटले आहे

हिमेश रेशमियाने दिली होती पहिली संधी
रानू मंडल यांचा पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. रानू यांचे पहिले गाणे ‘तेरी मेरी कहाणी’ प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...