आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी 2022:रणवीर-दीपिकाने अंबानी कुटुंबासोबत दिला बाप्पाला निरोप, धमाल करताना दिसला रणवीर सिंग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलीकडेच उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत गणेश विसर्जनाला हजेरी लावली. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही अंबानी कुटुंबासोबत झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये बसलेले दिसत होते. यावेळी दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसले. व्हिडिओमध्ये रणवीर एन्जॉय करताना दिसत आहे. रणवीरने डान्स केला आणि ढोल वाजवतानाही तो दिसत आहे. रणवीर मस्ती करताना दिसला तर दीपिका बसलेली दिसली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. अलीकडेच रणवीर सिंगला 67 व्या फिल्मफेअरमध्ये '83' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...