आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरच्या 'करंट लगा' गाण्यावर चोरीचा आरोप:अल्लू अर्जुनच्या 'ब्लॉकबस्टर' गाण्याची कॉपी, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंगचा आगामी 'सर्कस' हा चित्रपट येत्या 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पहिले गाणे 'करंट लगा रे' रिलीज झाले आहे. या गाण्यातील रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान 'करंट लगा रे' हे गाणे अल्लू अर्जुनच्या 'ब्लॉकबस्टर' गाण्याची कॉपी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

'करंट लगा'चे संगीत अल्लू अर्जुनच्या गाण्यातून चोरले
'करंट लगा' या गाण्याची आता सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे, कारण या गाण्याचे पार्श्वसंगीत अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर गाण्यासारखे आहे. मूळ संगीत अल्लूच्या 'सरायनोडू' चित्रपटातील ब्लॉकबस्टर गाण्याचे आहे. चोरी पकडल्यापासून सोशल मीडिया यूजर्स निर्मात्यांना आणि कलाकारांना ट्रोल करत आहेतट

एका यूजरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन 'करंट लगा' गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'करंट लगा' गाण्यासोबतच अल्लू अर्जुनच्या 'ब्लॉकबस्टर' या चित्रपटातील गाणे मिक्स केले आहे. या दोन्ही गाण्यांचे संगीत सारखेच असल्याचे काही नेटक-यांचे मत आहे.

'टॉलिवूडची कॉपी नेहमी बॉलिवूड करते.' अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडिओला केली आहे. तर आणखी एका नेटक-याने कमेंट करत लिहिले, 'आधी ते चित्रपट कॉपी करत होते आता ते गाणी कॉपी करत आहेत.'

23 डिसेंबरला रिलीज होणार आहे 'सर्कस'
रणवीर सिंगचा 'सर्कस' हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट शेक्सपियरच्या लोकप्रिय नाटक 'द कॉमेडी ऑफ एरर्स'पासून प्रेरित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अजय देवगण या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे

बातम्या आणखी आहेत...