आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी शुक्रवारी 'मिझवान फॅशन वीक'मध्ये मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला. या इव्हेंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रणवीर पत्नी दीपिकाला किस करताना दिसत आहे. यासोबतच रणवीरने या इव्हेंटमध्ये आईच्या पाया पडून उपस्थितांची मने जिंकली. रणवीरने काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा आणि भरतकाम केलेला कोट परिधान केला होता. तर दीपिकाने क्रिस्टलचा हेवी वर्क लेहेंगा परिधान केला होता. या रॉयल लूकमध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात धरून रॅम्प वॉक केला.
आईच्या पडला पाया
रॅम्प वॉक दरम्यान रणवीर सिंग त्याची आई अनु भवनानी यांच्या पायाही पडल्या. या फॅशन शोमध्ये दीपिका आणि रणवीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
कोण कोण होते उपस्थित?
फॅशन शोमध्ये गौरी खान, करण जोहर, विद्या बालन, नोरा फतेही, इशान खट्टर, रितेश-जेनेलिया यांच्यासह अनेक सेलेब्स हजर होते. शबाना आझमी यांनी एनजीओ मिजवान वेलफेअर सोसायटीच्या सहकार्याने या फॅशन शोचे आयोजन केले होते.
अपकमिंग प्रोजेक्ट्स
रणवीर सिंग नुकताच 'रणवीर वर्सेस बेअर ग्रिल्स'मध्ये दिसला होता. चित्रपटाबद्दल बोलायचे तर तो शेवटचा 'जयेशभाई जोरदार'मध्ये झळकला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. रोहित शेट्टीच्या 'सर्कस' आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी'मध्ये तो दिसणार आहे. दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर ती 'पठाण', 'द इंटर्न' आणि प्रभासच्या एका चित्रपटात काम करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.