आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अनिल कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीर आणि अनिल एका अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेटवर 'जुग जुग जियो' या आगामी चित्रपटातील 'द पंजाबन' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रणवीर प्रिंटेड ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे. तर अनिल ग्रे सूटसोबत कलर फुल शर्टमध्ये दिसत आहे. दोघांची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली असून त्यांची एनर्जी पाहण्यासारखी असल्याचे चाहते कमेंट करत सांगत आहेत. रणवीर आणि अनिलबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही शेवटचे 'दिल धडकने दो' चित्रपटात एकत्र दिसले होते.
या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात नीतू कपूर आणि अनिल कपूर यांनी पती पत्नीची भूमिका वठवली आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. तसेच मनोरंजनाचा डबल डोस या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अभिनेता मनिष पॉल देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 24 जूनला हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.