आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरने खरेदी केली नवी प्रॉपर्टी:दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अलिबागमध्ये हॉलिडे होम बनवण्यासाठी खरेदी केली जागा, मुंबई-लंडनमध्येही आहे कोट्यवधींची मालमत्ता

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांनी अलीकडेच अलिबागमधील मापगाव येथे 90 गुंठे जागा विकत घेतली आहे.

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सध्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी अलीकडेच अलिबागमधील मापगाव येथे 90 गुंठे जागा विकत घेतली आहे. ही जागा त्यांनी सुमारे 22 कोटी रुपयांना विकत घेतली असून त्या जागेच्या नोंदणीसाठी हे दोघे सोमवारी अलिबाग येथील नोंदणी कार्यालयात गेले होते. अलिबागला जाताना दीपिकाने एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात रणवीर कारमध्ये नॅप घेताना दिसला होता. दीपिकाने फोटोला कॅप्शन दिले होते, 'मॉर्निंग व्ह्यू.'

दीपिका आणि रणवीरने विकत घेतलेल्या जागेच्या नोंदणीसाठी अलिबागमधील मुख्यालय दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात गेले होते. या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीरने अलिबागमध्ये विकत घेतलेल्या या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने गेल्याच महिन्यात बंगळुरु येथे एक महागडे सर्विस अपार्टमेंट खरेदी केले होते. सध्या या अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.

2014 मध्ये खरेदी केले होते 23 कोटींचे अपार्टमेंट
2014 मध्ये दीपिकाने मुंबईतील ब्यूमोंडे इमारतीच्या 30 व्या मजल्यावर दुसरा फ्लॅट खरेदी केला. 2319.50 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या फ्लॅटची किंमत 23.75 कोटी होती. विशेष गोष्ट म्हणजे दीपिका स्वतः 33 मजल्यांच्या या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर राहते.

700 मीटर अंतरावर आहे सिद्धिविनायक मंदिर

जेव्हा दीपिकाने हे घर खरेदी केले, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती की तिने हा फ्लॅट गुंतवणूक म्हणून विकत घेतला होता. पण तो खरेदी केल्यानंतरच ती या घरात शिफ्ट झाली होती. 2018 मध्ये लग्नानंतर रणवीरही तिच्यासोबत त्याच घरात शिफ्ट झाला. दीपिकाच्या या फ्लॅटपासून सिद्धिविनायक मंदिर फक्त 700 मीटर अंतरावर आहे. या मंदिरात दीपिका तिच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जाते. या घराचे इंटिरियर डिझायनिंग विनीता चैतन्य यांनी केले आहे.

2012 मध्ये तिने आर्किटेक्चरल डायजेस्ट मासिकाच्या पहिल्या अंकासाठी तिने या घरात फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये दीपिकाच्या भव्य अपार्टमेंटची झलक पाहायला मिळाली. दीपिका एक फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. म्हणून, तिच्या आवडीनुसार, या इमारतीत व्यायामासाठी ओपन डेक देखील आहेत. दीपिकाच्या तीन कारसाठी पार्किंग स्लॉट देखील आहे.

'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी लंडनमध्ये घर खरेदी केले
दीपिका पदुकोणने 'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी देशाबाहेर लंडनच्या एका पॉश भागात घर खरेदी केले होते. यापूर्वी तिने रणवीर सिंगसोबत गोव्यात एक बंगलाही खरेदी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...