आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिकाची वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:'गोलियों की रासलीला-रामलीला' चित्रपटातील एका किसींग सीनमुळे वाढली होती दोघांमधील जवळीक, सहा वर्षांच्या डेटिंगनंतर थाटले होते लग्न

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असे म्हटले जाते की, 'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटातील एका सीनमध्ये दोघेही इतके मग्न होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर आणि दीपिका इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाले होते. लग्नापूर्वी दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2012 मध्ये आलेल्या 'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली होती. हा दोघांचा एकत्र असलेला पहिला चित्रपट होता.

एका किसमुळे आले होते जवळ
दीपिका आणि रणवीरच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली होती. दोघांना पहिल्यांदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र पाहिले गेले होते. मात्र त्यांना बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा एकत्र आणले होते. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या भन्सालींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रिन शेअर केली होती आणि याच चित्रपटादरम्यान दोघांनामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली होती. असे म्हटले जाते की, चित्रपटातील एका सीनमध्ये दोघेही इतके मग्न होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

एका मुलाखतीत 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाच्या सेटवरील एका क्रू मेंबरने सांगितले होते की, ‘दीपिका आणि रणवीर यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी सुरु असल्याचे आम्हा सर्वांनाच वाटयचे. ही गोष्ट चित्रपटातील “अंग लगा दे रे” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सिद्ध झाली. त्यावेळी हे दोघे प्रेमात असल्याचे कन्फर्म झाले. या गाण्यातील एक किसिंग सीन खूपच पॅशनेट होता. रणवीर आणि दीपिकाचा हा किसिंग सीन शूट होत होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी सर्वांना समजले हे दोघे प्रेमात आहेत.’

व्हॅनिटी व्हॅनमध्ये तासन्तास एकत्र घालवायचे
यानंतर, ते दोघे सेटवर आल्यानंतर एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे. एकत्र जेवण करायचे आणि शूटिंगच्या फावल्या वेळेत व्हॅनिटी व्हॅनमध्ये तासन्तास एकत्र घालवायचे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर दोघांचे प्रेमप्रकरणदेखील तिथेच थांबेल, असे सगळ्यांना वाटत होते. पण तसे झाले नाही. यानंतर जेव्हा हे दोघे 'बाजीराव मस्तानी'मध्ये एकत्र आले तेव्हा समजले की हे नाते खूप पुढे जाईल.

ग्रुप डिनरच्या वेळीही दोघांचीही एकमेकांवरुन नजर हटत नसते. दोघेही विवाहित जोडप्याप्रमाणे तासन्तास गप्पा मारायचे. दीपिका आजूबाजूला असताना रणवीरची नजर केवळ तिच्यावरच खिळून राहत असे.

मीडिया रिपोर्टनुसार, बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी रणवीरने त्याचे सीन्स दिल्यानंतर सेटवरुन जात नसे. तो दीपिकासाठी तिथेच थांबायचा. रणवीरसाठी स्वतःपेक्षा दीपिकाचे करिअर जास्त महत्त्वाची आहे. दीपिकाला हॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला देणारी पहिली व्यक्ती रणवीरच आहे.

बातम्या आणखी आहेत...