आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनसाइड डिटेल्स:रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार रणवीर-वरुण, 5 महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण पुढील आठवड्यात होणार पूर्ण

अमित कर्ण18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात दोन सर्कस कंपन्यांची कहाणी

रणवीर सिंह गेल्या पाच महिन्यांपासून रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसेल. त्याच्यासोबत ‘फुकरे’ फेम वरुण शर्माही दुहेरी भूमिकेत असेल. चित्रपटात जास्त कलाकार, दोघांच्या दुहेरी भूमिका यामुळे चित्रीकरण जास्त काळ चालले. खरे तर, दुहेरी भूमिका असल्यामुळे दोन्ही कलाकारांना एकाच सीनचे दोनदा चित्रीकरण करावे लागत आहे.

चित्रपटातील जास्तीत जास्त कलाकारांचे चित्रीकरण संपले आहे. आता फक्त रणवीरचे थोडे चित्रीकरण राहिले आहे. एका आठवड्यात हे काम पूर्ण होईल. चित्रपटात रणवीर, वरुणसह जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे दिसणार आहे.

दोन सर्कस कंपन्यांची कहाणी
चित्रपटाबाबतची काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात रण‌वीर आणि वरुण हे अनुक्रमे रॉय व जॉय नावाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात दोघांची दुहेरी भूमिका आहे. या दोन्ही जोड्यांची सर्कस कंपनी असते. चित्रपटाची पूर्ण कहाणी सर्कस कंपनीच्या भोवती गुंफण्यात आली आहे.

चित्रपटाच्या प्रोमोचे 31 मार्च रोजी महबूब स्टुडिओमध्ये चित्रीकरण झाले. रोहित हा सिनेमा या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षात प्रदर्शित करण्याचे नियोजन करत आहे.

सेटवर सर्वांनी पाहिला ‘सूर्यवंशी’

रोहित शेट्‌ने ‘सर्कस’च्या सेटवर पूर्ण टीमसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपट पाहिला. या चित्रपटाची कॉपी ‘ओटीटी’साठी पाठवायची होती. नेटफ्लिक्स या चित्रपटाचा भागीदार आहे. येत्या 30 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता यावर प्रश्नचिन्ह आहे. मोठमोठ्या विश्लेषकांनाही हा चित्रपट प्रदर्शित शक्य होईल असे वाटत नाही.

रिलायन्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे पाहता 30 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित होणे कठीण आहे. प्रदर्शनाची तारीख चुकेल याची शक्यता आहे. तरीही आमची तयारी झाली आहे. आम्ही 11 एप्रिल रोजी प्रमोशन सुरू करणार आहोत. मात्र, यावर पुढच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.

बातम्या आणखी आहेत...