आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सेटवरून एक्सक्लुझिव्ह फोटो:पाच महिन्यांनंतर अभिनेता रणवीर सिंहचे सेटवर पुनरागमन, अ‍ॅड फिल्मच्या शूटिंगसाठी पोहोचला होता स्टुडिओत

अमित कर्ण, मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणवीरने रविवारी एका जाहिरातीचे चित्रीकरण केले.

अभिनेता रणवीर सिंह पुन्हा कामावर परतला आहे. त्याने अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओत जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. तेथील त्याचे फोटो समोर आले आहेत. रणवीर कामावर परतल्याने त्याच्यासोबतच्या अन्य कलाकारांनाही प्रेरणा मिळून तेही कामावर परततील असे मानले जात आहे. यापूर्वी अक्षय कुमार, आयुष्यमान खुराणा आणि आमिर खानसह अनेक कलावंतांनी शूटिंग सुरू केले आहे. रणवीरची पत्नी दीपिका पदुकोणही या आठवड्यात एका नाव न ठरलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेणार आहे.

इंडस्ट्रीतील सूत्रांनुसार, ‘रणवीर सारखे सुपरस्टार कलावंत स्टुडिओत येऊन शूटिंग करताहेत हे पाहिल्यावर इतर कलाकारांत सकारात्मक संदेश जाईल आणि कोविड-19 मुळे ठप्प झालेल्या इंडस्ट्रीचे कामकाज पुन्हा सुरू होण्यास मदत होईल.

इंडस्ट्रीजशी संबंधित सूत्रांनुसार, सुपरस्टार्सनी घराबाहेर पडत चित्रीकरणात सहभागी होणे आमच्यासाठी अत्यंत आ‌वश्यक आहे, कारण व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी ते मदतीचे ठरू शकते. इंडस्ट्रीत हळूहळू कामकाज सूरू होत आहे. शूटिंगसाठी येणाऱ्या सुपरस्टार्ससाठी शूटिंगचे वातावरण सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. नव्या चित्रपटांचे चित्रीकरणही सुरू लवकर सुरू व्हायला हवे आणि रणवीर शूटिंगसाठी बाहेर पडल्याचे पाहून निर्मात्यांना एक सकारात्मक संदेश मिळाला आहे.

0