आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टारडमने केलेला विक्रम:रणवीर सिंगने मोडला सेलेना गोमेझचा विक्रम,  बनला Giphy मध्ये 1.1 बिलियन व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला सेलिब्रिटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंग जगातील सर्वात मोठ्या यूथ आयकॉनमधून एक आहे. आता हे सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतातील सर्वात तरुण सुपरस्टार्स असलेला रणवीर चाहते आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि विशेषत: जगभरात राहणाऱ्या भारतीयांमध्ये तो लोकप्रिय आहेत. अमेरिकेचा प्रसिद्ध ऑनलाइन डेटाबेस आणि सर्च इंजिन Giphy वरही रणवीर  आहे. GIPHY ला अ‍ॅनिमेटेड इमेज किंवा GIFs तयार करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी प्रसिध्द आहे आणि त्यांच्या चॅनेलला आधीपासूनच 1.1 अब्ज व्ह्यूज मिळाली आहेत. असे करून, रणवीरने 961 मिलियन लाइक्स मिळवून सेलेना गोमेझला मागे टाकले आहे. अशा प्रकारे, रणवीर या प्लॅटफॉर्मव सर्वात वेगाने टॉपवर येणारा वर्ल्ड आयकॉन बनला आहे. 

रणवीर आता सर पॉल मॅक्कार्टनी, मॅडोना, टेलर स्विफ्ट आणि एरियाना ग्रांडे यासारख्या निवडक ग्लोबल पॉवर आयकॉनच्या यादीत सामील झाला आहे. ज्यांचे 1 अब्जाहून जास्त प्रोफाइल व्ह्यूअर आहेत. रणवीरने आपल्या वाढत्या सुपरस्टारडममुळे जगातील अनेक बड्या दिग्गजांना मागे टाकले आहे.

आमच्या एका सूत्राने सांगितले की, 'अनेक कारणांमुळे रणवीरच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोक, विशेषत: आजच्या तरुणांना त्याच्यात स्वतःची छवी दिसते. कारण त्याने आपल्या अद्भुत अभिनय कौशल्याद्वारे तरुणांच्या मनात जागा बनवली आहे." तो ज्या प्रकारचे चित्रपट करतो हे पाहून असे म्हणता येईल की त्याची इक्विटी बरीच स्ट्राँग आहे, तसेच इलेक्ट्रिक फॅशन सेन्समुळे मोठ्या संख्येने लोक त्याला शोमॅन मानतात. तो देशातील सर्वात तरुण पुरुष सुपरस्टार आहे.  सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे 56 दशलक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडच्या सर्व पुरुष कलाकारांविषयी सांगायचे झाले तर तो इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप 3 मध्ये आहे. जगभरात त्याच्या फॅन क्लब्समध्ये जवळपास 4.5 मिलियन फॅन्स सामिल आहेत. 

जगभरातील लोक करत आहे फॉलो

सूत्रांनी सांगितले की, 'रणवीरचे फॉलोअर्स अमेरिका, यूके, स्कॉटलंड, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी, अफगाणिस्तान, श्रीलंका, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युएई, कॅनडा आणि जपान या देशांमध्येही आहेत. काही आफ्रिकन देशांमध्ये देखील त्याचे चाहते आहे. खरं तर, तो एक ग्लोबल फिनॉमिना बनला आहे आणि गेल्या दोन वर्षात त्याने दिलेल्या मोठ्या ब्लॉकबस्टरने या अभिनेत्याला एक उत्कृष्ट स्टार बनविले आहे. तर, जर त्याच्या GIF ला जबरदस्त व्ह्यूज मिळाली तर हे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.'

बातम्या आणखी आहेत...