आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिकाची नवी मालमत्ता:रणवीर-दीपिकाच्या अलिबागच्या नवीन बंगल्यात सुरु झाले इंटेरिअरचे काम, 22 कोटी आहे या आलिशान हॉलिडे होमची किंमत

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणवीर-दीपिकाने त्यांची ही नवीन प्रॉपर्टी तब्बल 22 कोटींमध्ये खरेदी केली आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये नवीन बंगला खरेदी केल्यामुळे चर्चेत आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता दोघांनी बंगल्याच्या इंटेरिअरवर काम करायला सुरुवात केली आहे. त्यांनी बंगल्याच्या इंटेरिअची जबाबदारी इंटेरिअर डिझायनर विनिता चैतन्य यांच्यावर सोपवली आहे. विनिता यांनीच दीपिका-रणवीरचे मुंबईचे घर डेकोरेट केले आहे. अलीकडेच विनिता यांनी सोशल मीडियावर रणवीर-दीपिकासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिघेही हसताना दिसत आहेत. विनिता यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या कारमध्ये हे कोण आहेत? दीपिका आणि रणवीर तुमचे अलिबागमध्ये स्वागत आहे.'

22 कोटी आहे मालमत्तेचे मूल्य
रिपोर्ट्सनुसार, रणवीर-दीपिकाने त्यांची ही नवीन प्रॉपर्टी तब्बल 22 कोटींमध्ये खरेदी केली आहे. याशिवाय, दोघांनी मालमत्तेचे मुद्रांक शुल्क म्हणून 1.32 कोटी रुपये दिले आहेत. अलिबागमधील मापगाव येथे नऊ हजार स्वेअर फूटमध्ये ही मालमत्ता आहे. दीपिका आणि रणबीरने ही मालमत्ता त्यांच्या फर्म आरएस वर्ल्डवाइड एंटरटेन्मेंट प्रायवेट लिमिटेड आणि केए एंटरप्राइज एलएलपी अंतर्गत खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने गेल्याच महिन्यात बंगळुरु येथे एक महागडे सर्विस अपार्टमेंट खरेदी केले होते. सध्या या अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.

2014 मध्ये खरेदी केले होते 23 कोटींचे अपार्टमेंट
2014 मध्ये दीपिकाने मुंबईतील ब्यूमोंडे इमारतीच्या 30 व्या मजल्यावर दुसरा फ्लॅट खरेदी केला. 2319.50 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या फ्लॅटची किंमत 23.75 कोटी होती. विशेष गोष्ट म्हणजे दीपिका स्वतः 33 मजल्यांच्या या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर राहते.

'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी लंडनमध्ये घर खरेदी केले
दीपिका पदुकोणने 'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी देशाबाहेर लंडनच्या एका पॉश भागात घर खरेदी केले होते. यापूर्वी तिने रणवीर सिंगसोबत गोव्यात एक बंगलाही खरेदी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...