आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरची नवीन प्रॉपर्टी:रणवीर सिंह-दीपिका पदुकोणने अलिबागमध्ये घेतली 22 कोटींची प्रॉपर्टी, स्टॅम्प ड्युटीसाठी भरले 1.32 कोटी रुपये

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 कोटी आहे मालमत्तेचे मूल्य!

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलीकडेच अलिबागमधील मापगाव येथे 90 गुंठे जागा विकत घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत. या जागेच्या नोंदणीसाठी हे दोघे सोमवारी अलिबागमधील मुख्यालय दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात गेले होते. आता यासंदर्भात आणखी काही माहिती समोर आली आहे.

22 कोटी आहे मालमत्तेचे मूल्य!
रिपोर्ट्सनुसार, रणवीर-दीपिकाने त्यांची ही नवीन प्रॉपर्टी तब्बल 22 कोटींमध्ये खरेदी केली आहे. याशिवाय, दोघांनी मालमत्तेचे मुद्रांक शुल्क म्हणून 1.32 कोटी रुपये दिले आहेत. दीपिका आणि रणबीरने ही मालमत्ता त्यांच्या फर्म आरएस वर्ल्डवाइड एंटरटेन्मेंट प्रायवेट लिमिटेड आणि केए एंटरप्राइज एलएलपी अंतर्गत खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने गेल्याच महिन्यात बंगळुरु येथे एक महागडे सर्विस अपार्टमेंट खरेदी केले होते. सध्या या अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.

2014 मध्ये खरेदी केले होते 23 कोटींचे अपार्टमेंट
2014 मध्ये दीपिकाने मुंबईतील ब्यूमोंडे इमारतीच्या 30 व्या मजल्यावर दुसरा फ्लॅट खरेदी केला. 2319.50 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या फ्लॅटची किंमत 23.75 कोटी होती. विशेष गोष्ट म्हणजे दीपिका स्वतः 33 मजल्यांच्या या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर राहते.

'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी लंडनमध्ये घर खरेदी केले
दीपिका पदुकोणने 'पद्मावत' रिलीज होण्यापूर्वी देशाबाहेर लंडनच्या एका पॉश भागात घर खरेदी केले होते. यापूर्वी तिने रणवीर सिंगसोबत गोव्यात एक बंगलाही खरेदी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...