आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीझर आउट:क्रिकेट वर्ल्ड कपच्या विजयावर आधारित रणवीर सिंगच्या '83' चा टीझर रिलीज, चार दिवसांनी येणार ट्रेलर

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट येत्या 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 83 या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. टीझरसोबत रिलीज डेटची घोषणादेखील झाली आहे. हा टीझर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. 30 नोव्हेंबरला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट येत्या 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

25 जून 1983 रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा 59 सेकंदाच्या टीझर शेअर केला आहे. यात 1983 मध्ये झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे.

टीझर शेअर करत रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ही आतापर्यंतची सर्वांत चांगली कथा आहे. 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासह एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटात रणवीर कपिल देव आणि दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...