आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्टमध्ये दावा:रणवीर सिंगने आपल्या मानधनात केली वाढ, रोहित शेट्टीच्या चित्रपटासाठी घेतले 50 कोटी, दर दिवसाला कमावतोय 66 लाख रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या चित्रपटात रणवीर झळकणार आहे.

'सिंबा' आणि 'सूर्यवंशी' नंतर रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आता आपल्या प्रत्येक हिट चित्रपटानंतर मानधनात वाढ करणार आहे.

  • दररोज 66 लाख रुपये कमवतोय?

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रणवीर 75 दिवस या चित्रपटाचे शुटिंग करणार आहे. त्यानुसार तो दररोज सुमारे 66 लाख रुपये आकारत आहे. अशा पद्धतीने तो सध्याच्या घडीतील सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता ठरला आहे.

  • वार्षिक उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त

2019 च्या फोर्ब्सच्या यादीनुसार रणवीर सिंग दरवर्षी सुमारे 118 कोटी रुपये कमावतो. भारताच्या 100 सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींच्या यादीत तो 7 व्या स्थानी आहे. तर 2018 मध्ये या यादीत तो 8 व्या स्थानावर होता. तथापि, कोरोना काळामुळे त्याचा कोणताही चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला नाही.

  • 'सर्कस'चे शूटिंग मार्चमध्ये पूर्ण होणार

‘सर्कस’ चे शूटिंग मुंबईत सुरू आहे. रिपोर्टनुसार मेकर्स मार्चपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करतील आणि त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात होईल. हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. त्यामुळे त्याचे बहुतेक शूटिंग स्टुडिओमध्ये झाले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये '83' आणि' 'जयेशभाऊ जोरदार' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...