आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PETA ने रणवीरला दिले अनोखे आमंत्रण:म्हणाले- आमच्या कॅम्पेनसाठी देखील न्यूड फोटोशूट कर, पामेला एंडरसनचे दिले उदाहरण

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही आमच्यासाठी बोल्ड फोटोशूट करा - PETA

रणवीर सिंह सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या शूटमुळे त्याच्यावर मुंबईत अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व वादादरम्यान पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) ने रणवीरला न्यूड फोटोशूटसाठी आमंत्रित केले आहे. PETA ने रणवीरला त्यांच्या शाकाहारी मोहिमेचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे.

तुम्ही आमच्यासाठी बोल्ड फोटोशूट करा - PETA
रणवीर सिंहच्या निमंत्रण पत्रात PETA ने लिहिले - आम्ही मासिकासाठीचे तुमचे न्यूड फोटोशूट पाहिले आहे. आमच्या शाकाहारी मोहिमेसाठी आम्ही तुमचे एक धाडसी फोटोशूट घेण्यासाठी उत्सुक आहोत. तुमचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे, तुम्ही 'All Animals Have Same Parts - Try Vegan' या टॅगलाइनसह PETA इंडियाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट कराल का? यासोबतच PETA ने अमेरिकन मॉडेल पामेला एंडरसनचे उदाहरणही दिले आहे. पेटाच्या या मोहिमेसाठी पामेलाने फोटोशूट केले होते.

'रॉकी और रानी की प्रेमकहानी'साठी झाला व्हेगन
रणवीरने नुकतेच त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटासाठी रणवीर पूर्णपणे शाकाहारी झाला आणि त्याने हा डाएट फॉलो केला. त्यामुळेच पेटाने रणवीरला आपल्या प्रचारासाठी आमंत्रित केल्याची चर्चा आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत.

25 जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आला
25 जुलै रोजी रणवीरविरोधात मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होता. रणवीरने सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करून महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी (एनजीओ) ललित श्याम यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. ही एनजीओ पूर्व मुंबई उपनगरात आहे. चेंबूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा क्रमांक 547/2022 हा आहे. एवढेच नाही तर तक्रारदाराने रणवीरच्या अटकेची मागणी केली होती.. तक्रारदाराने माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, आयटी कायद्याच्या कलम 67अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. : रणवीर
रणवीर सिंगने नुकतेच पेपर मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केले. न्यूड फोटोशूटबाबत एका मुलाखतीत रणवीर म्हणाला, 'नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्समध्ये मी नग्न झालो आहे.' पुढे तो म्हणाला, 'तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. तो किती नग्न आहे? मी हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. पण, ते अस्वस्थ होतात इतकेच.'

बातम्या आणखी आहेत...