आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकापासून विभक्त होण्याच्या वृत्तावर रणबीरची प्रतिक्रिया:म्हणाला- 'देवाची कृपा आहे आम्ही भेटलो आणि 10 वर्षांपासून एकत्र आहोत'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. अलीकडेच, सोशल मीडियावर या दोघांमध्ये बिनसले असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान रणवीरने यावर प्रतिक्रिया दिली आणि दीपिकासोबतच्या नात्यावर मनमोकळेपणे भाष्य केले.

रणवीरने वेगळे होण्याचे वृत्त फेटाळून लावले
आता रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणाला, "देवाची कृपा आहे… आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आणि 2012 मध्ये डेट करायला सुरुवात केली आणि आज दहा वर्षांनंतर 2022 पर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत," असे रणवीर म्हणाला.

'ब्रेकिंग! दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यात सर्व काही ठीक नाही!!', अशा आशयाचे ट्विट समोर आल्यानंतर दीपिका आणि रणवीर यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती. त्यानंतर हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

तुम्ही आम्हाला स्क्रीनवर लवकरच एकत्र पाहाल

याशिवाय दीपिकासोबत पुन्हा काम करण्याबाबत बोलताना रणबीर म्हणाला, 'मला तिच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी तिची खूप प्रशंसा करतो. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मी तिच्याकडून खूप काही शिकलो आहे. सर्वांसाठी एक गोड सरप्राईज लवकरच येत आहे. तुम्ही लोक आम्हाला लवकरच एकत्र पाहाल. ती माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक आहे आणि माझ्या आयुष्यात ती आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,' असे रणवीर म्हणाला.

दीपिका-रणवीरचे आगामी प्रोजेक्ट्स

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दीपिका 2023 मध्ये शाहरुख आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती हृतिक रोशनच्या 'फायटर' या चित्रपटाचाही एक भाग आहे. दुसरीकडे, रणवीर दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सर्कस' चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. याशिवाय तो आलिया भट्टसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...