आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीरला बॉलिवूडमध्ये आज दहा वर्षे पूर्ण:रणवीर सिंह म्हणाला - ‘लुटेरा’च्या वेळी झालेल्या जखमेमुळे मी बदललाे, त्यामुळे लाेक मला ‘अतरंगी’ म्हणतात

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फॅशनमध्ये माझ्या आवडीला बोल्ड आणि अतरंगी म्हटले जाते.

गुरुवारी रणवीर सिंहला इंडस्ट्रीत 10 वर्षे पूर्ण झाली. त्याचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बारात’ 2010 मध्ये 10 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. आपले करिअर यश-अपयश आणि निर्णायक टप्प्याविषयी त्याने ‘दिव्य मराठी’साेबत चर्चा केली...

  • पदार्पण अन् यशाचा प्रवास कसा राहिला?

मी करिअरची सुरुवात हिट चित्रपटाने केली होती, तरीदेखील माझा संघर्ष सुरूच होता. कारण त्या वेळी मंदीचा काळ होता. आजच्याप्रमाणे डिजिटल प्लेटफॉर्मदेखील नव्हते. आज संधीच संधी आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याची संधी मिळते. माझ्या पदार्पणाच्या काळात ते शक्य नव्हते. तेव्हा आदित्य चोप्रा म्हणत, जितक्या जास्त लोकांना भेटणार तितकी तुमची प्रसिद्धी होणार. लोकांचे प्रेमही तुम्हाला तितकेच मिळेल. मला लोकांना भेटायला आणि बोलायला आवडते. त्या काळात मी जवळजवळ तीन ते साडेतीन वर्षे एका चांगल्या संधीच्या शोधात होतो. मला काम करण्याची आवड होती. कधीकधी मी काही मूर्खपणाही केला होता, पण मार्गावर ठाम राहिलो. मी वयाच्या 21 व्या वर्षी प्रयत्न सुरू केला आणि वयाच्या 24 व्या वर्षी मला उत्तम संधी मिळाली. मी हे नेहमी लक्षात ठेवेन. अक्षय कुमारच्या 'पटियाला हाऊस'मध्ये मी एका भूमिकेतून पदार्पण करणार होतो. त्या काळी मी काही लहान बजेटचे चित्रपटदेखील केले, ज्यात बऱ्याच दिग्दर्शकांचा सहभाग होता. यानंतर माझ्या नशिबाने वळण घेतले आणि मी पुढे निघत गेलो.

  • तुझी फॅशन सेन्स खूप वेगळी आहे ?

फॅशनमध्ये माझ्या आवडीला बोल्ड आणि अतरंगी म्हटले जाते. लुटेराच्या वेळी मला पाठीत मार लागला, त्या घटनेने माझे आयुष्य बदलले. त्या काळात माझा दृष्टिकोनही बदलला. त्या क्षणानंतर मी पूर्णपणे ऑथेंटिक बनण्याचा प्रयत्न केला. जे आवडते ते घालायचे ठरवले. एक अतरंगी सारखे...

  • पात्राची निवड तू कसा करतोस ?

माझे चित्रपट ‘लुटेरा’ आणि ‘राम-लीला’ लागोपाठ रिलीज रिलीज झाले. ‘दिल धडकने दो’ आणि ‘बाजीराव मस्तानी’देखील एका वर्षात रिलीज झाले. यांच्या कथा आणि माझ्या पात्रात खूपच अंतर आहे. याच्या 2 महिन्यांच्या आत ‘सिम्बा’ आणि ‘गली बॉय’ रिलीज झाले होते. त्यात जमीन-अस्मानचा फरक होता. मी प्रत्येक प्रकारचे पात्र साकारू इच्छित आहे आणि ते चांगल्या प्रकारे करू इच्छित आहे. कोणीही माझे पोस्टर पाहिले तर त्यांना या जनरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असे वाटायला पाहिजे.

  • आधीच्या आणि आताच्या कामात काय फरक आहे ?

मी जेव्हा ‘जयेशभाई जोरदार’ पाहिला तेव्हा वाटले, मी एक अनुभवी रणवीर सिंह पाहत आहे. पहिल्या चित्रपटावेळी मी खूपच अडाणी होतो. मात्र कामाचे कौतुक झाले तर हिंमत वाढते. मग मोठी रिस्क घेण्याची हिंमत वाढते.

दुसरीकडे यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने ‘बँड बाजा बारात’चे दिग्दर्शक मनीष शर्मांसोबतही चर्चा केली आणि चित्रपटाचे किस्से जाणून घेतले

  • दहा वर्षांपूर्वी मी दिग्दर्शक म्हणून ‘फॅन’ बनवणार हाेताे : मनीष शर्मा

मी यशराजमध्ये एक सहदिग्दर्शक म्हणून काम करत हाेतो. ‘फना’, ‘आजा नच ले’ आणि ‘रब ने बना दी जोड़ी’ सारख्या चित्रपटावर सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सर्वात आधी फॅन बनवणार होतो, मात्र ‘बँड बाजा बारात’आधी बनला. सह दिग्दर्शक म्हणूनच ‘आजा नच ले’ पूर्ण केला तेव्हा आदीला फॅनविषयी बाेललो होतो. तेव्हा आदी म्हणाला होता, हा खूप मोठा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अजून खूप मेहनत घ्यावी, असा त्याने सल्ला दिला होता. त्याच्या दोन महिन्यानंतर अादीने मला पुन्हा फोन केला आणि स्टुडिओला येण्याचे सांगितले. त्यांनी मला सांगितले की, शाहरुखसोबत ‘रब ने बना दी जोडी’ बनवत आहे. आम्ही तो बनवला. त्याचे काम संपताच मी आदीला पुन्हा विचारले, आपण फॅन बनवायचा का ? आदी म्हणाला, यात खूप खर्च आहे. यापेक्षा एखाद मध्यम बजेटचा चित्रपट बनव. त्यानंतर देव जाणे ‘बँड बाजा बारात’चे बिट्टू आणि श्रुती माझ्या जीवनात आले. दिग्दर्शक म्हणून या हाच किस्सा आहे. तो चित्रपट बनला आणि यशस्वी झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser