आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीत रणवीर सिंगच्या मागे धावला चिमुकला:अभिनेत्याने लगेच कडेवर उचलून घेतले, नेटकरी म्हणाले - 'तूच सुपरस्टार आहेस'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंग जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच तो एक चांगला माणूस आहे. आता रणवीरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात रणवीरच्या वागण्याचे लोक भरभरून कौतुक करत आहेत. नुकताच रणवीर एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. येथे रणवीरची एक झलक बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत एक छोटा मुलगा रडत होता. त्याला पाहून रणवीर कोणताही विचार न करता थांबला आणि त्याला कडेवर उचलून घेतले.

'सर्कस'च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता रणवीर
मालाडमध्ये झालेल्या 'सर्कस' चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला रणवीरने हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आणि चाहत्यांनाही थिरकायला लावले. कार्यक्रम संपल्यावर रणवीर तिथून जायला निघाला तेव्हा त्याला एका चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आला आणि तो अचानक थांबला. गर्दीत अडकलेल्या मुलाला रणवीरने लगेच उचलून घेतले आणि त्याला शांत केले. तो चिमुकला मुलगा रणवीरला भेटण्यासाठी त्याच्या मागे धावत होता. आता रणवीरचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीरच्या फॅन क्लबने शेअर केलेला व्हिडिओ पाहून लोक त्याच्या स्वभावाचे कौतुक करत आहेत.

लोकांनी केले रणवीरचे कौतुक
चिमुकल्यासाठी रणवीरचे हे वागणे चाहत्यांना आवडले असून ते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने रणवीरचे कौतुक करत, 'रणवीर सिंग तूच सुपरस्टार आहेस. लव्ह यू..' असे म्हटले आहे.

23 डिसेंबरला येतोय रणवीरचा 'सर्कस'
रणवीर सध्या त्याच्या आगामी सर्कस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट येत्या 23 डिसेंबरला रिलीज होतोय. चित्रपटात रणवीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसह जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, मुकेश तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाय अजय देवगण आणि दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...