आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात रणवीरला लागली लॉटरी:अभिनेता रणवीर सिंहची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, एकामागोमाग एक साइन केले 9 ब्रँड्स; कमावले तब्बल 70 कोटी

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत सातत्याने वाढ होतेय.

बॉलिवूडचा नावाजलेला अभिनेता रणवीर सिंहच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत वाढ होतेय. कोरोना महामारीच्या काळात रणवीरने तब्बल नऊ नवीन ब्रॅण्ड साइन केले आहेत. रणवीर एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी 7 चे 12 कोटी रुपये मानधन घेतो. अशाप्रकारे त्याने नऊ ब्रॅण्डसोबत करार करुन कोरोनाच्या काळात तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे.

रणवीरने कोरोनाच्या काळात टेलिकॉमपासून ते बांधकामपर्यंत, शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत, सेनेटरी वेअरपासून ते पर्यटनापर्यंत, गेमिंगपासून ते फॅन एंगेजमेंट कंपनीपर्यंत 9 नवीन ब्रँडशी करार केला आहे. यासह, हे ब्रॅण्ड साइन करुन त्याच्या एकुण ब्रॅण्ड्सची संख्या ही 34 झाली आहे. अशाप्रकारे रणवीरची लोकप्रियता ब्रॅण्ड्समध्ये कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर रणवीरची फॅन फॉलोइंग 6 कोटींच्या घरात आहे. त्याचे फॅन क्लब जगभरात 65-70 देशात पसरले आहेत आणि हे ब्रॅण्ड्ससाठी आकर्षणाचे कारण आहे.

चित्रपटांच्या मानधनातही रणवीरने केली आहे वाढ
'सिंबा' आणि 'सूर्यवंशी' नंतर रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आता आपल्या प्रत्येक हिट चित्रपटानंतर मानधनात वाढ करणार आहे.

दररोज 66 लाख रुपये कमवतोय?
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रणवीर 75 दिवस या चित्रपटाचे शुटिंग करणार आहे. त्यानुसार तो दररोज सुमारे 66 लाख रुपये आकारत आहे. अशा पद्धतीने तो सध्याच्या घडीतील सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता ठरला आहे.

वार्षिक उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त
2019 च्या फोर्ब्सच्या यादीनुसार रणवीर सिंग दरवर्षी सुमारे 118 कोटी रुपये कमावतो. भारताच्या 100 सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींच्या यादीत तो 7 व्या स्थानी आहे. तर 2018 मध्ये या यादीत तो 8 व्या स्थानावर होता. तथापि, कोरोना काळामुळे त्याचा कोणताही चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला नाही.

'सर्कस'चे शूटिंग मार्चमध्ये पूर्ण होणार ‘सर्कस’ चे शूटिंग मुंबईत सुरू आहे. रिपोर्टनुसार मेकर्स मार्चपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करतील आणि त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात होईल. हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. त्यामुळे त्याचे बहुतेक शूटिंग स्टुडिओमध्ये झाले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये '83' आणि' 'जयेशभाऊ जोरदार' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...