आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:18 दिवसांपासून अडकले आहे रणवीरच्या 'सर्कस'चे केवळ एका दिवसाचे चित्रीकरण, ऊटीत शूटिंगला परवानगी मिळाली नाही म्हणून महबूब स्टुडिओत बनवला सेट

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिक क्रू मेंबर्स असल्याने मिळाली नाही चित्रीकरणाला परवानगी

कोविडच्या दुस-या लाटेने मेगा बजेट चित्रपटांच्या शूटिंगला ब्रेक लावला आहे. निर्मात्यांना नाईलाजाने शूटिंगसाठी नवीन पर्याय शोधावे लागत आहेत. मात्र काही चित्रपटांसाठी कोणताच मार्ग मिळत नाहीये. उदाहरण म्हणजे रणवीर सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर "सर्कस" हा चित्रपट. या चित्रपटाचे जवळपास चित्रीकरण पूर्ण झाले आहे, केवळ एका दिवसाचे चित्रीकरण मागील 18 दिवसांपासून अडकले आहे.

अधिक क्रू मेंबर्स असल्याने मिळाली नाही चित्रीकरणाला परवानगी
चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'संपूर्ण टीम 12 एप्रिल रोजी शूटसाठी ऊटीला जाणार होती. येथे दुहेरी भूमिकेतील रणवीर सिंह, जॅकलिन आणि पूजा हेगड यांच्यातील रोमँटिक सीन्स शूट केले जाणार होते. या सर्व दृश्यांमध्ये 50 हून अधिक ज्युनिअर आर्टिस्ट होते. 100 हून अधिक क्रू मेंबर्सची एक टीम संपूर्ण युनिट सांभाळण्यासाठी जाणार होती. परंतु ऊटी प्रशासनाने इतक्या मोठ्या संख्येने शूटिंग करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे निर्मात्यांनी मेहबूब स्टुडिओत ऊटीचा सेट तयार केला. पण कोविड प्रोटोकॉलमुळे महाराष्ट्रातही शूटिंग थांबल्यामुळे ते कामही रखडले आहे.'

'सर्कस'चे प्राणी व्हीएफएक्सद्वारे दाखवले जातील
चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'चित्रपटाचे शीर्षक 'सर्कस' असले तरी यात पिंज-यात बंद असलेल्या ख-याखु-या प्राण्यांसोबत चित्रीकरण करण्यात आलेले नाही. चित्रपटा80 टक्क्यांपेक्षा जास्त व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. मेकर्सनी स्टुडिओत प्राण्यांचे स्टॅच्यु वापरुन सीन शूट केले. आता ते व्हीएफएक्सच्या मदतीने जिवंत केले जातील, जसे 'टोटल धमाल' मध्ये केले गेले होते. चित्रपटात रणवीरनेही काही उडणा-या गाड्यांसोबत स्टंट सीन शूट केले आहेत. मात्र तेदेखील स्टुडिओच्या आत चित्रीत करण्यात आले आहे. 'सर्कस' हा रोहित शेट्टींचा पहिला चित्रपट आहे, ज्याचे बहुतेक शूटिंग हे स्टुडिओच्या आत करण्यात आले आहे.'

मोठ्या बजेटचे हे चित्रपटही अडकले आहेत
'सर्कस' शिवाय ब-याच मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे शूटिंग रखडले आहे. जाणून घ्या ...

  • आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई'चेदेखील आता फक्त एक दिवसाचे काम बाकी आहे.
  • अजय देवगणचा 'मेडे' आणि "मैदान".
  • शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण'.
  • सलमान-कतरिनाचा 'टायगर 3'.
  • वरुण धवनचा 'जुग जुग जियो'.
बातम्या आणखी आहेत...