आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहची चौकशी होणार:मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस; महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणी वाढू शकतात. मुंबई पोलिसांनी त्याला 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. काही पोलीस अधिकारी त्याला नोटीस देण्यासाठी त्याच्या घरी गेले होते परंतु रणवीर बाहेरगावी आहे.

22 जुलै रोजी रणवीरने पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. सोशल मीडियावर हे फोटो समोर आल्यानंतर मुंबईतील एका एनजीओने रणवीरविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
एनजीओने म्हटले होते की, रणवीरने आपल्या न्यूड फोटोद्वारे महिलांच्या भावना दुखावल्या असून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याचा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून हटवण्यात यावा. त्याच्या अटकेची मागणीही करण्यात आली. रणवीरवर 26 जुलै रोजी आयपीसीच्या कलम 509, 292, 293, आयटी कायद्याच्या कलम 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीरला होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा
तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी 48 तासांचा वेळ मागितला होता. यानंतर रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम 292 अन्वये 5 वर्षे आणि कलम 293 अंतर्गत 3 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. त्याचबरोबर रणवीरला आयटी कायदा 67A अंतर्गत 5 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.

रणवीर म्हणाला- न्यूड झाल्याने मला काही फरक पडत नाही
फोटोशूटनंतर एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता- 'माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या न्यूड होणे खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्समध्ये मला नेकेड केले गेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. तो किती नेकेड आहे? मी हजारो लोकांसमोर माझे सर्व कपडे काढू शकतो. मला काही फरक पडत नाही, पण तिथे उपस्थित असलेले लोक थोडे अनकम्फर्टेबल होतील.'

पत्नी दीपिकासह अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला
या फोटोशूटमुळे रणवीरला प्रचंड ट्रोल करण्यात आले. अनेक प्रकारचे मीम्सही व्हायरल झाले. पत्नी दीपिका पदुकोण, राम गोपाल वर्मा, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, मसाबा गुप्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोशूटवर रणवीरला पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...