आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार सोहळ्यात अश्रू अनावर झाल्याने रणवीर सिंग ट्रोल:यूजर्स म्हणाले - पती-पत्नी दोघेही सगळीकडे रडू लागतात

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्वी कलाकार अनेकदा त्यांच्या संघर्षाचा काळ आठताना भावूक होताना दिसतात. नुकताच अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याला अश्रू अनावर झाले. रणवीरने नुकतीच ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाइट 2022’ सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याला या दशकाचा सुपरस्टार म्हणून गौरविण्यात आले. जेव्हा रणवीरला हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा तो स्वीकारतान तो खूप भावूक झाला. त्याने यावेळी त्याचे वडील जगजित सिंग भवनानी यांचे आभार मानले. "तुम्हाला ठाऊक आहे 12 वर्षांपूर्वी जेव्हा मी या क्षेत्रात येण्यासाठी धडपड करत होतो. त्यावेळी मला एक पोर्टफोलिओ बनवायचा होता. जेणेकरून मला प्रत्येक ठिकाणी काम मागायला जाता येईल. पोर्टफोलिओचे बजेट तब्बल 50000 होते, मला ते फारच महाग वाटत होते तेव्हा तुम्ही म्हणाला होता की, बेटा तुला जे हवंय ते कर, तुझा बाबा सदैव तुझ्या मदतीसाठी उभा असेल", असे रणवीरने सांगितले.

नेटक-यांना मात्र रणवीरचे रडणे आवडले नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने म्हटले, ओव्हर अॅक्टिंगसाठी त्याच्याकडून 50 रुपये कापून घ्या, आणखी एका यूजरने लिहिले, पती-पत्नी दोघेही सगळीकडे रडू लागतात. आणखी एका युजरने लिहिले, या अभिनयासाठी त्याला ऑस्कर दिला पाहिजे. रणवीरच्या या व्हिडिओवर अशा विविध प्रतिक्रिया येत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...