आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:रणवीर सिंगच्या नवीन चित्रपटाची घोषणा, हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय हुमा कुरैशी, 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या शूटसाठी गोव्याला रवाना झाला अर्जुन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून तो सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’ याचा हिंदी रिमेक असणार आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. मूळ तमिळ चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता विक्रमने प्रमुख भूमिका साकारली होती. रणवीरने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तो म्हणतो, 'मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की मी भारतीय सिनेमाच्या एका दूरदर्शी कलाकार शंकरसोबत काम करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा करणार आहेत.'

हा मूळ चित्रपट ‘अपरिचित’ या नावाने हिंदीत डब करण्यात आला होता. याला भारताच्या सर्वच प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. रणवीर लवकरच ‘83’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरने रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. याशिवाय तो अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी'मध्ये कॅमिओ करणार आहे.

  • ‘आर्मी ऑफ द डेड’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय हुमा कुरैशी

अभिनेत्री हुमा कुरैशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जॅक स्नायडर अभिनीत ‘आर्मी ऑफ द डेड’ या चित्रपटात हुमा गीता नावाचे पात्र साकारत आहे. हा एक जबरदस्त थ्रिलरपट आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये हुमाची एक झलक दाखवण्यात आली आहे. तूर्तास तिच्या भूमिकेबाबत माहिती मिळालेली टआर्मी ऑफ द डेड' 2004 मध्ये आलेल्या 'डॉन ऑफ द डेड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून जॅक स्नायडरने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.

  • 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या शूटसाठी गोव्याला रवाना झाला अर्जुन कपूर

कोरोना कर्फ्यूमुळे मुंबईत 1 मे पर्यंत चित्रपट, वेब शो आणि मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एक व्हिलन रिटर्न्सच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अर्जुन कपूर गोव्याला रवाना झाला आहे. अर्जुनच्या म्हणण्यानुसार तो पुन्हा मोहित सूरीबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. तो म्हणाला, "आम्ही 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटादरम्यान खूप चांगला वेळ एकत्र घालवला होता." गोव्याबद्दल बोलायचे झाले तर अर्जुनने यापूर्वी तिथे 'फाइंडिंग फॅनी'चे चित्रीकरण केले होते.

  • ‘1947’ चित्रपटासाठी एकत्र आले मुरुगदास आणि ओमप्रकाश भट्ट

'गजनी’ आणि 'हॉलिडे’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आणि पॅन इंडिया फिल्मचे प्रोड्युसर ओमप्रकाश भट्ट एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘1947’ असेल. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन पोन कुमारन करणार आहेत. तूर्तास हा चित्रपट निर्मितीच्या प्राथमिक पातळीवर आहे. लवकरच त्याचे काम सुरू होऊन तो रसिकांसमोर येईल. यापूर्वी पोन कुमारन यांनी कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यात "चारुलता’, 'जयललिता’ आणि 'तिरुपती एक्सप्रेस’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

  • ‘लीगसी’मध्ये अक्षय आणि रवीना प्रथमच दिसणार एकत्र

अक्षय खन्ना आणि रवीना टंडन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. दोघेही लवकरच विजय गुट्टेंच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘लीगसी’ वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. याबाबतची माहिती देताना ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणाले, 'आफ्टर स्टुडिओज, एए फिल्म्स आणि सनी बक्शी यांची संयुक्त निर्मिती असलेली ही वेब सिरीज आहे. या वर्षाच्या शेवटी ती सुरू होईल.' यापूर्वी विजय गुट्टे यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित होता. या चित्रपटात अक्षय खन्नाची भूमिका महत्त्वाची होती.

बातम्या आणखी आहेत...