आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

119 कोटींच्या घरात शिफ्ट होणार रणवीर-दीपिका:दोघांनी मिळून खरेदी केला नवा आशियाना, याआधी दीपिकाच्या घरी राहात होता रणवीर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी नुकताच एकत्र मिळून नवा आशियाना खरेदी केला आहे. दोघेही त्यांच्या नवीन घरात प्रवेश करण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणवीरने सांगितले की, लग्नानंतर तो दीपिकासोबत तिच्या घरी राहत होता, पण आता दोघेही त्यांनी एकत्र खरेदी केलेल्या घरात शिफ्ट होतील. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिकाच्या या नवीन घराची किंमत सुमारे 119 कोटी आहे.

दोघांनी एकत्र मिळून घर विकत घेतले आहे
आपल्या नवीन घराबद्दल आणि दीपिका पदुकोणबद्दल मीडियाशी बोलताना रणवीर म्हणाला - 'दीपिका आणि मी नुकतेच आमचे पहिले घर खरेदी केले आहे, लग्नानंतर मी तिच्या घरी राहायला आलो आणि जवळपास 4 वर्षांपासून तिथे राहतोय. पण आता आम्ही आमचे घर विकत घेतले आहे.'

रणवीर पुढे म्हणाला, 'आम्ही दोघंही आपापल्या कामात खूप व्यग्र असल्यामुळे आणि आम्हाला एकत्र राहायला जास्त वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही घेतलेले नवीन घर शहराबाहेर तसेच शांत ठिकाणी आहे. आम्हा दोघांना क्वालिटी वेळ एकत्र घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.'

कुटुंबवत्सल आहे दीपिका
रणवीर पुढे म्हणाला- 'दीपिकाने हे नवीन घर खूप प्रेमाने सजवले आहे. लहान मुलगी जसे बाहुलीचे घर सजवते, तसेच दीपिकाही तिच्या आवडीनुसार नवीन घर सजवण्यात बिझी आहे. ती कुटुंबवत्सल आहे, तिला गृहिणी व्हायला आवडते. त्यामुळे मला माझ्या नवीन घरात माझ्या पत्नीसोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे.'

119 कोटींना खरेदी केले घर
रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर आणि दीपिकाने मुंबईत 119 कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी मिळून पहिले घर विकत घेतले आहे. यापूर्वी रणवीर दीपिकासोबत तिच्या घरी राहत होता.

2018 मध्ये झाले रणवीर-दीपिकाचे लग्न

दीपिका आणि रणवीरने नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले. 2012 मध्ये 'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 'रामलीला' व्यतिरिक्त दोघांनी 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि '83' सारख्या इतर चित्रपटात एकत्र काम केले आहे. रिअल लाईफ व्यतिरिक्त दोघांची रील लाईफ जोडी देखील खूप पसंत केली जाते.

रणवीर-दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट्स

रणवीर सिंगच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठान’ या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय ती हृतिक रोशनसोबत 'फायटर' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

बातम्या आणखी आहेत...