आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंडस्ट्रीतील वाद:सिनेसृष्टीतील घराणेशाही आणि गटबाजीवर रणवीर शौरी म्हणाला - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सर्वांसमोर बॉलिवूडचे पितळ उघडे पडले आहे

अंकिता तिवारी. मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्युने आम्हाला हैराण करुन सोडले आहे. आता तरी येथील लोकांना सद्बुद्धी येईल, असे वाटते.

अभिनेता रणवीर शौरी आगामी चित्रपट लूटकेसमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत कुणाल खेमू आणि गजराज रावदेखील मुख्य भूमिकेत आहेत. दिव्य मराठीशी बोलताना रणवीरने हा चित्रपट आणि इंडस्ट्रीतील राजकारणावर आपले मत मांडले...

  • इतके चांगले चित्रपट करूनही तुम्ही ए ग्रेड चित्रपटात दिसत नाहीत? तुम्हाला रोल ऑफर होत नाहीत का ?

बॉलिवूड काही लोकांच्या हातात आहे, तेच लोक पूर्ण इंडस्ट्री चालवतात. मोठ्या चित्रपटात मला घेतले जात नाही. माझ्यात प्रतिभा नाही म्हणून नव्हे तर माझ्या विरुद्ध नेहमी राजकारण केले जाते. या इंडस्ट्रीत राजकारण चालते, मात्र मी छोटे असो की मोठे रोल करून नेहमी खुश राहतो. या लोकांनी मला जर मोठ्या चित्रपटात संधी दिली नाही तर मी छोट्या चित्रपटात काम करुन समाधानी राहू शकतो.

  • तुम्हाला पुरस्कार सोहळ्यात बोलावले जात नव्हते? कामाकडे दुर्लक्ष केले जात होते ?

आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा आपल्याला मुद्दामून इग्नाेर केले जाते, तेव्हा खूप वाईट वाटते. तुम्हाला जेव्हा पुरस्कार सोहळ्यात बोलावले जात नाही. तेव्हा वाईट वाटते. मी बऱ्याच चांगल्या भूमिका केल्या मात्र मला इंडस्ट्रीतून कधीच प्रोत्साहन मिळाले नाही. आधी परेशान व्हायचो मात्र आता सवय पडली आहे. आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. याविषयी विचार करणेच सोडले आहे. कारण येथे जे राजकारण आहे, ते माणसाला जगू देत नाही.

  • तुमच्या नुकत्याच केलेल्या ट्विटने दिग्दर्शक अनुराग कश्यप का भडकले होते ?

खरं तर, ते सर्व गैरसमजातून घडले होते. अनुराग कश्यप यांनी ते सर्वकाही आपल्यावर घेतले. मी त्या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतले नव्हते, मी बॉलिवूडच्या कार्यपद्धतीवर माझे मत मांडले होते. मात्र त्यांनी वैयक्तिक घेतले. अनुराग माझे चांगले मित्र आहेत. टि्वटर खूप मोठे माध्यम आहे, यावर कुणीही काहीही लिहिले तरी ते मोठे होतेच.

  • प्रतिभा असूनही बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागली ?

मी बाहेरचा आहे, असे मी कधीच म्हणणार नाही कारण माझे वडील येथे छोटे निर्माते होते, मात्र बॉलिवूडमधील राजकारणाने मला पुढे येऊ दिले नाही. बऱ्याचदा मनात इंडस्ट्री सोडण्याचा विचार आला, काही तरी करण्याचे ठरवले मात्र मला दुसरं काहीच येत नाही. कारण माझे प्रेम आणि पॅशन अभिनयच आहे, त्यामुळे मी का साेडू ? 2004 ते 2005 मध्ये अशी वेळ आली होती, तेव्हा मी काही काळ ब्रेक घेतला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सर्वांसमोर बॉलिवूडचे पितळ उघडे पडले आहे. आता बॉलिवूडचं सत्य सर्वांचे समोर येत आहे. सुशांतच्या मृत्युने आम्हाला हैराण करुन सोडले आहे. आता तरी येथील लोकांना सद्बुद्धी येईल, असे वाटते. मात्र काही लोक फारचं धोकादायक आहेत, त्यांना अशा गोष्टीमुळे काही फरक पडणार नाही. त्यांना अधिराज्य गाजवण्याची सवय पडली आहे.

  • लूटकेसमधील तुमच्या भूमिकेविषयी काही सांगा ‌?

हा एक विनोदी सिनेमा आहे. यात मी पोलिसाची भूमिका करत आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शक आहेत, त्यांनी माझ्या मिशांचा लूक ठरवला आहे. मिशांना कोणता आकार द्यायचा हे त्यांनीच ठरवले आहे.