आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर कचाट्यात अडकला '83':दीपिका पदुकोणसह चित्रपटाच्या सर्व निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप, निर्माते विष्णुवर्धन इंदुरी यांची प्रतिक्रिया आली समोर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आगामी ’83’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ’83’ चित्रपटावर दुबईमधील एक व्यक्तीने कट रचून फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
तक्रारीमध्ये 83 चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दीपिका पदुकोणवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कलम 405, 406, 415, 418, 420 आणि 120B अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये दीपिका शिवाय साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांचे देखील नाव आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की हैदराबादमध्ये चित्रपटाशी संबंधीत काही बोलणे झाले होते. तसेच विब्री मीडियाशी चित्रपटाच्या इनवेस्टमेंट विषयी देखील बोलणे झाले होते. जवळपास 16 कोटी रुपये यामध्ये त्या व्यक्तीने गुंतवले होते. पण निर्मात्यांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती न देता या सर्वातून काढल्यामुळे तक्रार केली आहे.

तक्रारकर्त्याच्या वकिलांनी काय सांगितले?
तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या वकीलांनी माहिती दिली आहे. ‘हे सत्य आहे की फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी 83 चित्रपटाच्या निर्मांत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आम्ही सुरुवातीला आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण चित्रपटाच्या निर्मात्यांना आमचे म्हणणे ऐकण्यात रस नसल्याचे मला कळाले. त्यामुळे आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.'

निर्माते विष्णुवर्धन इंदुरी यांचे वक्तव्य
निर्मात्यांविरुद्धच्या खटल्यावर निर्माते विष्णू वर्धन इंदुरी म्हणाले, "तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तक्रारकर्त्याला आधीच 83 चित्रपटांच्या प्रदर्शनावर आणि त्याच्याशी संबंधित कमर्शिअल अॅक्टिव्हिटीवर प्रभाव टाकण्यापासून रोखले आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयातील खटला तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे.'

24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
’83’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांचे आहे. 1983 च्या वर्ल्ड कप विजयावर आधारित या चित्रपटात रणवीर सिंह, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोणने कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका साकारली आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.

बातम्या आणखी आहेत...