आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दुस-या लाटेने देशात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बॉलिवूडमध्येही अनेक कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’चे एडिटर अजय शर्माचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 4 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. निधनाच्या दहा दिवस आधी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर अजय यांच्यासाठी ऑक्सिजन आणि बेडसाठी मदत मागितली होती.
अशोक पंडित यांच्या पोस्टनुसार, अजय यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 83 वर पोहोचली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण 4 मे रोजी अजय यांची प्राणज्योत मालवली.
अजयच्या निधनाने व्यक्त केली जात आहे हळहळ
अजय यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये शोककला पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.अजय यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने अजय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रिया पिळगावकर लिहिले, ‘मला अतिशय दु:ख झाले. आपण अजयला गमावले. तो केवळ एक एडिटर नव्हता तर माणूस म्हणून देखील चांगला होता’ असे श्रियाने म्हटले आहे.
या प्रोजेक्ट्साठी अजय यांनी केले होते काम
अजय शर्मा यांनी 'रश्मि रॉकेट'पूर्वी ‘जग्गा जासूस’, ‘कारवां’, ‘लूडो’, ‘इंदू की जवानी’, ‘हायजॅक’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘क्रूक’, ‘तुम मिले’ अशा अनेक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. तसेच त्यांनी 'बंदिश बँडिट्स'सह काही वेब सीरिजचे देखील एडिटिंग केले आहे. याशिवाय त्यांनी 'बर्फी', 'ये जवानी है दिवानी', 'अग्निपथ', 'काई पो चे', 'लाइफ इन ए मेट्रो', 'गोरी तेरे प्यार में', 'आई हेट लव स्टोरीज' आणि 'द डर्टी पिक्चर' चित्रपटांसाठी सहाय्यक एडिटर म्हणून काम केले होते.
एडिटिंगशिवाय अजय यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला होता. 1995 मध्ये आलेली शॉर्ट फिल्म 'जॉली' त्यांनी दिग्दर्शित केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.