आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मिका-विजय देवरकोंडाने एकत्र साजरे केले नवीन वर्ष?:एकाच ठिकाणचे फोटो करत आहेत शेअर, चाहते लावत आहेत डेटिंगचा अंदाज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या कथित नात्यामुळे चर्चेत असतात. पण आता त्यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमुळे त्यांच्या नात्याची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. नुकतेच दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून दोघांनी एकत्र न्यू इयर सेलिब्रेट केल्याचा अंदाज चाहते वर्तवू लागले आहेत.

विजय-रश्मिका एकत्र व्हेकेशन एन्जॉय करत आहेत?

विजयने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत विजयने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण एकत्र हासलो, गुपचूप रडलो, स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, तर काही गमावले…. सर्व क्षण साजरा करण्याची गरज आहे… कारण हे आयुष्य आहे… सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी चांगले जावो,' असे खास कॅप्शन विजयने लिहिले आहे.

तर दुसरीकडे रश्मिका मंदाना हिनेही एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅलो 2023.'

चाहते लावत आहेत डेटिंगचा अंदाज
विजय आणि रश्मिकाने सुट्यांचा आनंद घेताना फोटो पोस्ट केल्यामुळे दोघे एकत्र असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. दोघांच्या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत. ज्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

शूटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले

रश्मिकाचा दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीसोबतचा साखरपुडा तुटल्यानंतर काही काळातच रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करू लागले. त्यादरम्यान दोघांनी गीता गोविंदम (2018) आणि डियर कॉम्रेड (2019) सारखे अनेक चित्रपट एकत्र केले. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. काही काळ डेट केल्यानंतर दोघेही 2 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. पण या दोघांमध्ये पुन्हा प्रेम फुलत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात या दोघांनीही त्यांच्यातील नातेसंबंधांवर अद्याप तरी जाहीर भाष्य केलेलं नाहे. परंतु त्यांच्यातील प्रेमाची चर्चा मात्र सतत होत आहे.

विजय आणि रश्मिकाचे चित्रपट

कामाबद्दल सांगायचे तर रश्मिका मंदाना हिने अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'गुडबाय' या चित्रपटात काम केले आहे. हा तिचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. 'लायगर' हा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर विजय लवकरच आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. सध्या त्याच्याकडे सामंथा रुथ प्रभू हिच्याबरोबर कुशी नावाचा तेलुगु चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...