आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या आगामी 'पुष्पा: द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा-2'मध्ये रश्मिका मदानाच्या 'श्रीवल्ली' या पात्राचा मृत्यू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. आता या वृत्तावर 'पुष्पा'चे निर्माते वाय. रविशंकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पिंकविलाशी बोलताना वाय. रविशंकर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि म्हणाले, "आतापर्यंत आम्ही कथा वस्तुनिष्ठ आणि स्पष्टपणे ऐकलेली नाही, त्यामुळे तसे नाही आणि हा सगळा अंदाज आहे. सध्या तरी या चित्रपटाबद्दल कोणीही काहीही लिहित नाही. कथानकाबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. या अफवा अनेक वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनेलद्वारे प्रसारित केल्या जात आहेत, परंतु अशा सर्व बातम्या खोट्या आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
'पार्ट 2' मध्ये रश्मिकाचे पात्र जिवंत राहणार का?
'पार्ट 2' मध्ये रश्मिकाचे पात्र जिवंत राहणार का? या प्रश्नावर रविशंकर म्हणाले, हो नक्कीच. चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार? या प्रश्नावर चित्रपट निर्माते म्हणाले की, "चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. आम्ही सध्या शूटिंगची तयारी करत आहोत."
अल्लूने 'पुष्पा 2'साठी व्यक्त केला होता उत्साह
याआधी, पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'साठी त्याचा उत्साह व्यक्त केला होता. तो म्हणाला होता, "खरं तर मी खूप उत्साही आहे. हे शूट करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण मला खात्री आहे की आम्ही चित्रपटाच्या दुसऱ्या भागात खूप काही देऊ शकतो. भाग 1 पासून आम्ही एक बेस सेट केला आहे आणि आमच्याकडे एक अद्भुत कथा आहे. आम्ही सर्वजण आमचे सर्वोत्तम देण्याची मानसिकतेसह दुसऱ्या भागासाठी तयार आहोत."
400 कोटींच्या बजेटमध्ये बनणार आहे 'पुष्पा-2'
रिपोर्ट्सनुसार, मेकर्स 400 कोटींहून अधिकच्या मोठ्या बजेटमध्ये 'पुष्पा 2' बनवण्याचा विचार करत आहेत. चित्रपटाचे हे बजेट पहिल्या भागाच्या बजेटपेक्षा 2 पट जास्त आहे. 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट सुमारे 195 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता.
'पुष्पा: द राइज' गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता रिलीज
गेल्या वर्षी 17 डिसेंबरला रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज'मध्ये अल्लू अर्जुन 'पुष्पराज' आणि रश्मिका मंदाना 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसली होती. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात या दोघांसह फहाद फाजील, सुनील, सामंथा रुथ प्रभू, प्रकाश राज, अजय घोष यांच्यासह अनेक स्टार्स लीड रोलमध्ये दिसले होते. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला होता.
या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने केली होती 110 कोटींची कमाई
हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 110 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.