आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची मन की बात:रत्ना पाठक यांना साकारायच्या होत्या शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्यासारख्या भूमिका, म्हणाल्या - मला तशी संधी मिळाली नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 80 च्या दशकात रत्ना यांनी महिलांवर लिहिलेल्या भूमिका केल्या

अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या आतापर्यंतच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल सांगितले. मोठ्या पडद्यावर शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांनी साकारलेल्या ब-याच अशा भूमिका मला साकारायच्या होत्या, पण तशी संधीच मिळाली नाही, असा खुलासा रत्ना पाठक यांनी केला आहे. त्यांनी 'मंडी', 'मिर्च मसाला' आणि 'भारत एक खोज' सारख्या अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या करिअरमधील खरा ब्रेकआउट रोल टेलिव्हिजनवर 'इधर उधर' या मालिकेतून मिळाल्याचे त्या सांगतात. रत्ना पाठक यांची महत्त्वाची भूमिका असलेली ही विनोदी मालिका 1985 ते 1988 या काळात प्रसारित झाली होती आणि ही मालिका हिट ठरली होती.

80 च्या दशकात रत्ना यांनी महिलांवर लिहिलेल्या भूमिका केल्या
रत्ना म्हणाल्या, "मी 80 च्या दशकात माझी कारकीर्द सुरू केली, तेव्हा मी महिलांवर लिहिलेल्या भूमिका केल्या. शबाना आझमी, स्मिता पाटील यांनी साकारलेल्या ड्रॅमॅटिक भूमिका साकारायची माझी इच्छा होती, पण तशी संधी मला मिळाली नाही. नंतर मला ‘इधर-उधर’ ही मालिका मिळाली. या मालिकेमुळे माझा आयुष्याकडे, कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मी खुप नशिबवान आहे की माझा जो काही करिअर प्लान होता तो खुप छान घडला.'

ड्रॅमॅटिक भूमिका साकारण्याचा विचार केला होता
पुढे रत्ना यांनी सांगितले की, 'अनेक वर्ष मला माझ्या मनासारखे काम मिळत नव्हते, कारण लोकांना वाटायचे की मी त्या भूमिकेसाठी योग्य नाही. आणि हे नंतर माझ्यासाठी खूप फायद्याचे ठरले कारण यामुळेच मी छोट्या पडद्याकडे वळले. मला इधर-उधर ही पहिली मालिका मिळाली. ही मालिका 1984-85 मधे प्रदर्शित झाली होती. मला असे वाटले होते की, या मालिकेत काही ड्रामा असेल मात्र ही एक विनोदी मालिका होती. मी या भूमिकेसाठी काहीच तयारी केली नव्हती. पण मी खूप उत्सुक होते कारण मला काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. या मालिकेमुळे माझी विनोदी भूमिकेशी ओळख झाली.'

बातम्या आणखी आहेत...