आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन फन:सोशल मीडियावर चाहत्यांना हसवत आहे रवीना टंडन, मुलगी राशाबरोबरचे मजेदार व्हिडिओ केले शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रवीनाने यापूर्वी सध्या व्हायरल झालेले स्विच चॅलेंज मुलीसोबत केले होते.

देशभरात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूड स्टार्स या दिवसांत आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत. कामातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनसुद्धा मुलगी राशासोबत मस्ती करत आहे. अलीकडेच रवीना आणि तिच्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघी टिक-टॉक ट्रेंड फॉलो करत व्हिडिओ बनवत आहेत. टिक-टॉकवरील आपल्या मजेशीर व्हिडिओने सर्वांचे मन जिंकणारी रवीना इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही चाहत्यांना हसवत आहे. रविवारी तिने मुलगीराशाबरोबरचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये रवीना मुलीला अपमानास्पद वागणूक देताना दिसत आहे, ज्यावर मुलगी वारंवार तिला टोकत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये रवीना आणि राशा 'ओह ना ना' गाण्यावरचा ट्रेंड फॉलो करताना नाचत आहेत.

रवीनाने यापूर्वी सध्या व्हायरल झालेले स्विच चॅलेंज मुलीसोबत केले होते. यात दोघीही एकमेकींचे कपडे बदलून डान्स करत होत्या. रवीनाने स्विच चॅलेंजसह टीक टॉकवर एन्ट्री केली होती. पहिल्या व्हिडिओनंतर तिच्या फॉलोअर्सची संध्या वाढली होती. सध्या तिचे अकाऊंटवर 86 हजार फॉलोअर्स आहेत. 

बातम्या आणखी आहेत...