आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडे बोल:कर्नाटकमधील भाजपच्या आमदाराने लॉकडाऊनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवस, रवीना टंडन म्हणाली - 'महाराज की जय हो'  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री रवीना टंडनचे ट्विट व्हायरल झाले आहे.

कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यातील तुरुवेकर येथे भाजपचे आमदार एम. जयराम यांनी कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनची पर्वा न करता आपला वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सर्वांसोबत केकच कापला नाही तर सर्व समर्थकांना बिर्याणीची पार्टीही दिली. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची प्रतिक्रिया आली आहे. रवीना टंडनने  आपल्या ट्विटद्वारे भाजपच्या आमदारावर निशाणा साधला आहे.

रवीना टंडनने  एम. जयराम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, "अप्रतिम, महाराज की जय हो. कोविड इडियट्स."

रवीनाच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्सही प्रतिक्रिया देत आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने 40 जणांचा जीव घेतला असून तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा  7 हजार 447 वर पोहचला आहे. कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण कर्नाटकात घडलेल्या या प्रकाराने शासनाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र दिसून आले आहे.   

बातम्या आणखी आहेत...