आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री रवीना टंडनने 1995 मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यावेळी ती स्वत: 21 वर्षांची होती. बॉलिवूडमधील करिअर जोरदार सुरू असताना असा निर्णय तिच्या करिअरला ब्रेक लावू शकतो, शिवाय तिच्याशी कुणीही लग्नाला तयार होणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मुलींना दत्तक घेण्याच्या या निर्णयाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना व्यक्त झाली आहे.
'प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान'
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'त्या दोघींविषयी (छाया आणि पूजा) माझ्या मनात अशी काही भावना निर्माण झाली होती की वयाच्या 21 व्या वर्षी मला तो निर्णय घेण्यात काहीच गैर वाटले नव्हते. माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्कृष्ट निर्णय होता. त्यांना माझ्या मिठीत घेण्यापासून ते त्यांची लग्न होईपर्यंत त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.'
'त्यावेळी माझा निर्णय अनेकांना आवडला नव्हता'
रवीना पुढे म्हणाली, 'त्यावेळी लोकांना माझा निर्णय फार काही आवडला नव्हता. माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही असे देखील काहीजण म्हणाले. पण म्हणतात ना, नशिबात जे लिहिलेले असते, ते कसेही पूर्ण होते.'
2004 मध्ये डिस्ट्रीब्युटरसोबत केले लग्न
रवीना टंडनने 2004 मध्ये चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न केले. या दोघांनाही दोन मुले (मुलगी राशा आणि मुलगा रणबीर वर्धन) आहेत. दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलींपैकी छाया एअरहोस्टेस तर पूजा इव्हेंट मॅनेजर आहे. दोघींचीही लग्न झाली असून त्यांनाही मुले आहेत.
2016 मध्ये एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली होती, "माझ्या मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला आठवतंय, जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा दोघेही माझ्याबरोबर कारमध्ये होत्या आणि मला मंडपात घेऊन गेल्या होत्या. आता मला त्यांच्यासोबत चालण्याची संधी मिळाली आहे. ही खरोखर खूप खास फिलींग आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.