आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After NCB Summoned Deepika Padukone And Others, Raveena Tandon Said Celebrities Are Soft Targets But Without Local Authorities Help Drugs Can't Be Supplied

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर मोठे विधान:रवीना टंडन म्हणाली - सेलिब्रिटींना सॉफ्ट टार्गेट केले जाते, स्थानिक प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही, असे रवीना म्हणाली आहे.

नशेच्या विळख्यात सापडलेल्या बॉलिवूडचा पर्दाफाश होत आहे. अनेक ए-लिस्टरची नावे ड्रग्ज प्रकरणात आता समोर येत आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, श्रद्धा कपूर या नावाजलेल्या अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान यावर रवीना टंडन हिने मोठे विधान केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही, असे रवीना म्हणाली आहे.

  • रवीनाने दोन ट्विटमध्ये केले आरोप

आपल्या दोन ट्विटमध्ये रवीनाने स्थानिक प्रशासनाला लक्ष्य केले आहे. ती म्हणते - ''माझ्या ट्विटमधील मोठे लोक. स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय कोणत्याही ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही. या प्रकरणातील मोठ्या लोकांना कोणीही प्रश्न विचारणार नाही. जर एक पत्रकार शोध घेऊन पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. तर मग अधिकारी त्यांना शोधून का काढत नाहीत?. सेलिब्रिटींना सॉफ्ट टार्गेट केले जाते,’ असे रवीना म्हणाली आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये ती म्हणाली- 'ड्रग्जचा पुरवठा करणारे शाळा, महाविद्यालये, पब, रेस्तराँच्या बाहेर आढळतात. ड्रग सिंडिकेट्स ज्यात बरेच शक्तिशाली लोक आहेत, ते आपले डोळे बंद करुन तरुणांचे आयुष्य खराब करत आहेत. हे सर्व थांबायला हवे. ड्रग्जविरुद्ध ड्रग्जविरूद्ध मोठा लढा देशभर पसरला पाहिजे,' अशा आशयाचे दुसरे ट्विट तिने केले आहे.

  • यापूर्वीही ड्रग्ज संदर्भात व्यक्त केले होते मत

यापूर्वीही रवीना म्हणाली होती की, इंडस्ट्रीमध्ये मोठ्या साफ सफाईची वेळ आली आहे. आपल्या येणाऱ्या पिढीची मदत करा. येथून सुरुवात करुया मग दुसऱ्या क्षेत्राकडे वळुया. येथून मुळापासून काढून टाकूया. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्स यांना शिक्षा मिळायला हवी. फायदा घेणारे लोकं निशाण्यावर आहेत,’ या आशयाचे ट्विट रवीनाने तीन दिवसांपूर्वी केले होते.

बातम्या आणखी आहेत...