आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:रवीना टंडनने दिला आर्यनला पाठिंबा, सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाली - 'तुम्ही त्याच्या भविष्यासोबत खेळत आहात'

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाजिरवाणे राजकारणे केले जात असल्याचे मत रवीनाने व्यक्त केले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई करत मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देताना दिसत आहेत. अभिनेत्री रवीना टंडन हिनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यनला पाठिंबा दिला आहे. लाजिरवाणे राजकारणे केले जात असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.

रवीनाची पोस्ट
रवीनाने आर्यन खानला पाठिंबा देत ट्विट केले आहे. ‘लाजिरवाणे राजकारण केले जात आहे. हे एका तरुणाचे आयुष्य आहे आणि तुम्ही त्याच्या भविष्यासोबत खेळत आहात. हे भयानक आहे,’ असे रवीनाने म्हटले आहे.

जीवन हा एक विचित्र प्रवास आहे
रवीनापूर्वी गुरुवारी अभिनेता हृतिक रोशनने आर्यनला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्याच्या फोटोसह शेअर केली होती. हृतिकने या पोस्टमध्ये आर्यनला या कठिण काळाचा त्याने कसा सामना करायला हवा, हे सांगितले आहे. हृतिकने लिहिले होते, ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो.’ असे म्हणत हृतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे हृतिक म्हणाला, ‘तू आता या परिस्थितीचा सामना करत आहे. तुमच्यामधील एका हिरोला बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आयुष्यात होणे गरजेचे आहे. पण सावध रहा. कारण या गोष्टी तुझ्यामधील दयाळूपणा, प्रेम अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतात.’ हृतिक रोनच्या या पोस्टवर त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने प्रतिक्रिया देताना हेच सत्य आहे, असे लिहिले. हृतिकच्या या पोस्टवर काही नेटक-यांनी मात्र ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला ट्रोलदेखील केले आहे.

2 ऑक्टोबरच्या रात्री ताब्यात घेतले होते
एनसीबीने शनिवारी (2 ऑक्टोबर) रात्री आर्यनला ताब्यात घेतले होते. 22 तासांच्या चौकशीनंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीचा आरोप आहे की, आर्यन इंटरनॅशनल ड्रग पॅडलरच्या संपर्कात होता. आर्यनने एनसीबीसमोर मागील चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचे कबुल केले आहे. त्याचा खटला प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे लढवत आहेत. मुंबई न्यायालयाने आर्यन खानसह आठ जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने म्हटले आहे की एनसीबीला तपासासाठी पुरेपूर संधी आणि वेळ देण्यात आली आहे, त्यामुळे आता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...