आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचिव्हमेंट:रवीना टंडनच्या मुलीने तायक्वांदोमध्ये मिळवला ब्लॅक बेल्ट, रवीनाने सोशल मीडियावर लिहिले - मला तुझा खूप अभिमान वाटतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 वर्षांची आहे रवीनाची मुलगी

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशाने तायक्वांदो या मार्शल आर्टच्या प्रकारात ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. रवीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत राशा आणि तिच्या सर्टिफिकेटसोबतचा फोटो शेअर केला आहे. “मेरी बेटी ब्लॅक बेल्ट... मला तुझा खूप अभिमान वाटतो,” असे कॅप्शन देत रवीनाने राशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोवरुन रवीनाला मुलीच्या यशाचा आनंद झाल्याचे पाहायला मिळतंय. 'संपूर्ण वेळ मास्क घालून आणि पूर्ण खबरदारी घेत तू परीक्षा दिली, या परीक्षेमध्ये सुरक्षा महत्वाची आहे. ती तू बाळगलीस याचा मला खूप आनंद होतोय आणि खास करुन ‘उद्या शाळेत जायचंय ना’ हे तूझं वाक्य,' असे कॅप्शन देत रवीनाने मुलीच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सोशल मीडिया यूजर्सनी दिल्या शुभेच्छा
सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी रवीना आणि तिच्या मुलीचे कौतुक केले आहे. अभिनेता समीर सोनी यांने ‘मस्तचं, सर्व मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे किंवा तायक्वांदो अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले पाहिजे’ अशी कमेट केली आहे. तर ‘आई तशी मुलगी हुशार’ अशी कमेंट काही चाहत्यांनी दिली आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले, 'प्रत्येक आईने आपल्या मुलीकडून ब्लॅक बेल्ट मिळवण्याची आशा केली पाहिले. स्वतःचा आणि इतरांचा आत्मविश्वास वाढवला पाहिले. देवाचा आशीर्वाद कायम राहो.'

15 वर्षांची आहे रवीनाची मुलगी
रवीना टंडनने फेब्रुवारी 2004 मध्ये चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न केले होते. जुलै 2005 मध्ये त्यांची मुलगी राशाचा जन्म झाला. मार्शल आर्टबरोबरच राशा बॉक्सिंगचेही प्रशिक्षण घेत आहे. जानेवारी 2019 मध्ये रवीनाने राशाच्या बॉक्सिंग प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. रवीनाला राशासह 13 वर्षांचा मुलगा असून रणवीरवर्धन असे त्याचे नाव आहे. लग्नापूर्वी रवीनाने 1995 मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...