आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी किशनचा वाढदिवस:रामलीलामध्ये स्त्री पात्र साकारल्याने रवी किशनला वडिलांनी केली होती मारहाण, आईच्या सांगण्यावरुन घर सोडून पळाले आणि झाले स्टार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रवी किशन यांचे पूर्ण नाव रवी किशन शुक्ला आहे.

भोजपुरी सिनेसृष्टीचे सुपरस्टार रवी किशन यांनी 17 जुलै रोजी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. रवी किशन आज कोट्यवधीश आहेत. मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्याकडे एक वेळच्या जेवणालासुद्धा पैसे नसायचे. एका मुलाखतीत स्वतः रवी किशन यांनी हा खुलासा केला.

रवी किशन म्हणाले होते, 1990 साली मी जेव्हा गाव सोडून मुंबईत दाखल झालो, तेव्हा माझ्याकडे खायला पैसे आणि डोक्यावर छत नव्हते. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी हाती येईल ते काम मी केले. काम मिळाले, तर पोटभर जेवायचो अन्यथा उपाशी पोटी रात्र काढावी लागायची.

गावात नाटकांमध्ये साकारायचे स्त्री पात्र...
रवी किशन यांनी सांगितले होते की, त्यांना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. गावात नाटकात काम करण्याची एकही संधी ते गमावत नसे. गावात जेव्हाही नाटक व्हायचे, तेव्हा त्यांची एक भूमिका ठरलेली असायची. त्यांनी या नाटकांमध्ये स्त्री पात्र अधिक साकारले.

रवी किशन यांच्या वडिलांचे डिसेंबर 2019 मध्ये निधन झाले.
रवी किशन यांच्या वडिलांचे डिसेंबर 2019 मध्ये निधन झाले.

रवी किशन यांचे पूर्ण नाव रवी किशन शुक्ला आहे. 17 जुलै 1969 रोजी जौनपूरच्या बिसुईं या एका छोट्या गावात जन्मलेल्या रवी यांच्या पत्नीचे नाव प्रीती आहे. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. रेवा, तनिष्क आणि इशिता ही त्यांच्या तीन मुलींची तर सक्षम हे मुलाचे नाव आहे.

जेव्हा आई म्हणाली, बेटा जीव वाचव आणि येथून पळून जा...
रवी यांनी सांगितले होते, गावात कधीकधी त्यांना रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारावी लागायची. त्यांच्या वडिलांना त्यांचे स्त्री पात्र साकारणे पसंत नव्हते. वडिलांची इच्छा होती, की त्यांच्या मुलाने नाटकात काम न करता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. मुलगा नालायक झाला, असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. त्यांचा मुलगा घराण्याच्या नावाला कलंक लावत असल्याचा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे रवी किशनला नेहमी त्याच्या वडिलांच्या हातचा मार खावा लागायचा. एकेदिवशी रागाच्या भरात त्यांच्या वडिलांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. आईने मध्यस्थी करुन रवी किशनला वडिलांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर आई म्हणाली, की स्वतःचा जीव वाचव आणि येथून पळून जा. आईचे म्हणणे ऐकून रवी किशन यांनी घर सोडले आणि ते मुंबईत पोहोचले.

मी एखाद्या अभिनेत्रीसोबत लग्न तर करणार नाही... वडिलांना वाटायची भीती..
पुढे रवी यांनी सांगितले होते, मी वडिलांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लग्न केले. त्यांना वाटायचे, की मी एखाद्या अभिनेत्रीसोबत लग्न करेल. त्यांना या गोष्टीची नेहमी काळजी वाटायची. पण मी आईवडिलांच्या पसंतीनेच लग्न केले. मी स्टार झाल्यानंतर माझे वडील खूप आनंदी झाले. रवी किशनच्या वडिलांच्या रुपात लोक ओळख असल्याचा त्यांना अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.

शिवभक्त आहे रवी किशन
अभिनयाशिवाय रवी यांना नृत्याचीही आवड आहे. जेव्हा ते 8 वर्षांचे होते तेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात आणि गणपती पुजेमध्ये डान्स करायचे. रवी शिव भक्तही आहे.

तेलुगु, कन्नड आणि गुजराती सिनेमांमध्येही केले काम
रवी किशन यांनी भोजपुरी आणि हिंदी सिनेमांसोबतच इतर भाषांमध्येही काम केले आहे. यामध्ये सुप्रीम, ओक्का अम्माई थप्पा आणि राधा (तेलुगु), हेबुल्ली (कन्नड) आणि हमीर (गुजराती) या चित्रपटांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...