आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे मोठे भाऊ राम किशन शुक्ला यांचे रविवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 53 वर्षांचे होते रवी किशन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. गेल्यावर्षीच त्यांच्या एका भावाचे कर्करोगाने निधन झाले होते.
रवी किशन यांचे पीआरओ पवन दुबे यांनीही या निधनाची माहिती दिली आहे. रवी किशन यांचे मोठा भाऊ 53 वर्षांचे होते. मुंबईत राहून ते रवी किशन यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काम पाहायचे. 5 फेब्रुवारी रोजी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, मात्र दुपारी 12 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गेली 18 वर्षे ते रवी किशन प्रोडक्शनचे काम पाहत होते. रवी किशन यांना तीन भाऊ आहेत. राम किशन दुसऱ्या क्रमांकावरचे होते. त्यांना 25 वर्षांचा मुलगा असून तो सरकारी नोकरी करतो, तर त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे.
रवी किशन काय म्हणाले?
रवी किशन यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "दुःखद… माझे मोठे भाऊ श्री राम किशन शुक्ला यांचे आज (रविवारी) दुपारी 12 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तुम्हाला त्यांच्या चरणी स्थान द्यावे अशी मी महादेवाला प्रार्थना करतो," असे त्यांनी म्हटले.
आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, "राम किशन भाऊ आमच्या घरचे राम होते, त्यांचा शांत हसरा चेहरा फसवा नव्हता, त्यांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. आज मी एकटाच राहिलो. त्यांच्या पुण्यवान आत्म्याला शांती लाभो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करा."
गेल्यावर्षी झाले होते थोरल्या भावाचे निधन
मुळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या विशुईबराई गावाचे रहिवाशी असलेले रवी किशन तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांचे वडील श्याम नारायण शुल्का यांचे तीन वर्षांपूर्वी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. रवी किशन यांचे थोरले भाऊ रमेश किशन गावातच वास्तव्याला होते. गेल्यावर्षी 30 मार्च रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. आता त्यांच्या दुसऱ्या भावानेही जगाचा निरोप घेतला. वडील आणि दोन भावांना गमावल्यानंतर आज मी एकटाच राहिलो, असे रवी किशन म्हणाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.