आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:नितीन चंद्रकांत देसाईंच्या ND स्टुडिओला भीषण आग, 'जोधा अकबर'चा सेट आगीत जळून खाक; आगीचे नेमके कारण आले समोर

अमित कर्ण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुराचे लोट बऱ्याच दूरवरुनही दिसत असल्याने आग भीषण असल्याचे दिसून येते. या आगीत जोधा अकबरचा सेट जळून खाक झाल्याची माहिती मिळते. - Divya Marathi
धुराचे लोट बऱ्याच दूरवरुनही दिसत असल्याने आग भीषण असल्याचे दिसून येते. या आगीत जोधा अकबरचा सेट जळून खाक झाल्याची माहिती मिळते.
  • पनवेल आणि कर्जत रेल्वे लाईन जवळील सुकलेले गवत पेटवले असताना एनडी स्टुडिओला आग लागली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओला भीषण आग लागली आहे. येथे शुटिंगसाठी तयार करण्यात आलेल्या सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कर्जत नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत 'जोधा अकबर' चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याचा सेट जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय.

  • आगीमागचे कारण आले समोर

एनडी स्टुडिओला लागलेल्या आगीमागचे कारण समोर आले आहे. स्टुडिओचे सुरक्षा प्रभारी जयराम यांनी सांगितले, 'एनडी स्टुडिओच्या मागील बाजूस पनवेल व कर्जत या रेल्वेमार्गाजवळ साफसफाईचे काम सुरु होते. ही स्वच्छता दरवर्षी होते. यासाठी रेल्वे विभाग रेल्वे लाईनच्या सभोवतालचे सुकलेले गवत जाळते. एवढ्या वर्षांत आतापर्यंत यासंदर्भात पुर्वसुचना दिली जायची. मात्र यावेळी तसे झाले नाही. शुक्रवारी सकाळी कामाला सुरुवात झाली तेव्हा सुरक्षा रक्षकांनी 'अशोका' या मालिकेचा सेट आगीपासून वाचवला. मात्र 'जोधा अकबर' या सेटच्या मागे एक गोदाम होता. त्यात फायबर, अॅक्रेलिक आणि इतर वस्तू होत्या. ते मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. स्टुडिओच्या उर्वरित भागाचे फारसे नुकसान झालेले नाही,' असे जयराम यांनी सांगितले.

जिथे जिथे आग लागली तेथे व्हॅल्युएशन केले जात आहे. किमान 20 ते 30 लाखांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रायगडमधील कर्जत येथे असलेल्या एनडी स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात चित्रपट थीमवर आधारीत पार्कही आहे. या ठिकाणी या अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपटांचे सेट आहेत.

बातम्या आणखी आहेत...