आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रम:कोरोनाच्या लढ्यासाठी संगीत सेतूचा चॅरिटी शो; 63 कोटी लोकांनी पाहिला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मदतनिधीसाठी १०, ११ व १२ एप्रिल राेजी रात्री ८ ते ९ दरम्यान संगीत सेतू चॅरिटी शाे आयाेजित करण्यात आला हाेता

काेराेना संसर्गाने देशभरात लाॅकडाऊन सुरू असल्याने देशाला डिजिटलच्या माध्यमातून जाेडण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीसाठी १०, ११ व १२ एप्रिल राेजी रात्री ८ ते ९ दरम्यान संगीत सेतू चॅरिटी शाे अायाेजित करण्यात अाला हाेता. हा कार्यक्रम पाहणाऱ्यांच्या संख्येने विक्रम नोंदवला आहे. दूरदर्शनच्या ३०० हून अधिक वाहिन्यांनी व ४० हून अधिक ऑनलाइन म्युझिकल वेबसाइट्स उदा. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आला. २५ कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला व इंटरनेटचा वापर करणाऱ्या २३ कोटी लोकांनी त्याला स्ट्रीम केले. अशा प्रकारे ६३ कोटी लोकांनी सोशल मीडियावर तो कार्यक्रम पाहिला.

१८ श्रेष्ठ संगीतकारांनी तीन मोठी वेब सिरीज आणली असूून कोरोनाच्या लढ्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, पोलिस, नागरी प्रशासन व इतर विभागातील लोकांसमवेत सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. गायिका लता मंगेशकरांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून या लढ्यातील लोकांचे कौतुक केले. अभिनेता अक्षय कुमारने तीन दिवस या व्हर्च्युअल म्युझिक कॉन्सर्टचे संचालन केले. कैलाश खेर व अनुप जलोटांसह अनेक गायकांनी याची सुरुवात केली. यात लता मंगेशकर, आशा भोसले, बालसुब्रमण्यम, के. जे. येसुदास, उदित नारायण, पंकज उधास, कविता कृष्णमूर्ती, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, कुमार सानू, हरिहरन, शंकर महादेवन, सोनू निगम, सलीम मर्चंट शान यासारख्या प्रसिद्ध गायक-गायिकांपासून नवोदितांनीही सहभाग नोंदवला. सोनू निगम याने दुबईतून सहभाग घेतला हाेता. तर येसू दास यांनी अमेरिकेतून या कार्यक्रमात हजेरी लावली. हा कार्यक्रम भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व इतर देशांतही दाखवण्यात आला. संगीत सेतू कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग, साउंड स्पेशालिस्ट अशी व्यवस्था नव्हती. कोणत्याही प्रकारची खास उपकरणे न वापरता एका मोबाइल फोनवरून कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...