आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिचा चढ्ढा आणि अली फजल 4 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतीच बातमी आली आहे की, हे जोडपे त्यांच्या लग्नात पर्यावरणाची विशेष काळजी घेणार आहेत. लग्नाआधीही रिचा आणि अली अनेकदा पर्यावरण रक्षणाबाबत मोकळेपणाने बोलत आले आहेत. त्यामुळे दोघांची टीम त्यांचे लग्न इकोफ्रेंडली कसे करता येईल, याची विशेष काळजी घेत आहे.
लग्नासाठी खास वेडिंग प्लॅनरची निवड
रिचा आणि अलीने लग्नासाठी अशा वेडिंग प्लॅनरची निवड केली आहे, जे इको फ्रेंडली गोष्टींच्या मदतीने सजावट करतात. इतकंच नाही तर हे वेडिंग प्लॅनर्स लग्नात अशा गोष्टींचा वापर करतात, ज्या पुन्हा रिसायकल केल्या जाऊ शकतात. सजावटीपासून ते लग्नपत्रिकेपर्यंत अशा गोष्टींचा वापर केला जाईल, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.
लग्नात अन्नाची नासाडी होणार नाही
रिचा आणि अलीच्या लग्नाच्या सर्व फंक्शन्समध्ये अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. यासाठी लग्नात विशेष तज्ज्ञाची व्यवस्था करण्यात आली आहे, जे या कामासाठी प्रसिद्ध आहेत. या विवाह सोहळ्यात रिचा आणि अलीने त्यांच्या टीम्सना प्लास्टिकचा कचरा कमी करण्यास आणि रिसायकल प्लास्टिकचा वापर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून, लग्नामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.