आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीना रॉय करायच्या क्लबमध्ये डान्स:शत्रुघ्न सिन्हांसोबत ब्रेकअप, 7 वर्षांतच मोडला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा संसार

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

70 आणि 80 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री रीना रॉय यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही त्यांना एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

रीना रॉय यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले. त्या लहान असतानाच त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने रीना यांनी क्लबमध्ये डान्स केला. सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापेक्षा वयाने 11 वर्षांनी मोठे असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी त्यांचे सूत जुळले होते. परंतु सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे मार्ग विभक्त झाले.

रिलेशनशिप संपुष्टात आल्यानंतर रीना यांनी स्वतःला सावरले आणि काही काळानंतर पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानशी लग्न केले. मात्र, त्यांचे लग्नदेखील फार काळ टिकले नाही. 7 वर्षांतच त्यांचा संसारही मोडकळीस आला. नवऱ्याकडून मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. या चढउतारांनंतर त्यांना सिनेसृष्टीत कमबॅक करायचे होते, पण यश न मिळाल्याने त्या बॉलिवूडपासून दुरावल्या.

आज रीना रॉय यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी -

लहान वयातच पालकांचा घटस्फोट पाहिला
रीना रॉय यांचा जन्म 7 जानेवारी 1957 रोजी अभिनेते सादिक अली आणि शारदा रॉय यांच्या घरी झाला. रीना रॉय यांना 4 भावंडे आहेत. लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. यानंतर आईने रीनासह सर्व मुलांचा सांभाळ केला.

घटस्फोटानंतर आईने सर्व मुलांची नावे बदलून हिंदू नावे ठेवली
घटस्फोटानंतर आई शारदा यांनी सर्व मुलांची नावे बदलली. कारण शारदा हिंदू होत्या तर त्यांचे पती सादिक अली मुस्लिम होते. घटस्फोटानंतर आपल्या मुलांनी वडिलांचे आडनाव वापरू नये असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी सर्व मुलांचे नाव बदलून हिंदू केले आणि प्रत्येकाच्या नावासमोर स्वतःचे रॉय आडनाव जोडले.

रीना रॉय यांचे पहिले नाव सायरा अली होते, जे त्यांच्या आईने बदलून रूपा रॉय केले. जेव्हा रूपा यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा त्यांचे नाव रीना रॉय झाले.

गरिबीमुळे क्लबमध्ये डान्स करायच्या आणि येथूनच नशीब बदलले
रीना रॉय यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी लहान वयातच क्लबमध्ये डान्स करायला सुरुवात केली. त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी.आर. इशारा यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी रीना यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. रीना यांना कामाची नितांत गरज होती, म्हणून त्यांनी होकार दिला.

पैशांसाठी 'जरुरत' हा चित्रपट केल्यानंतर लोक म्हणू लागले होते 'जरुरत गर्ल'

बी.आर इशारा यांचा हा चित्रपट 1972 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अशी काही दृश्ये होती ज्यासाठी एकही नायिका तयार नव्हती. त्याचे कारण म्हणजे यात सेमी न्यूड सीन्स होते. पण रीना यांना काम आणि पैशाची गरज असल्याने त्यांनी या चित्रपटात काम करायला होकार दिला. रीना यांनी डॅनी डेन्जोंगपा आणि इतर कलाकारांसोबतही इंटीमेट सीन्स दिले. त्या चित्रपटानंतर त्या 'जरुरत गर्ल'नावाने फेमस झाल्या. त्यानंतर रीना रॉय 1973 मध्ये रिलीज झालेल्या 'नई दुनिया नए लोग' या चित्रपटात दिसल्या.

11 वर्षांनी मोठ्या असलेल्या शत्रुघ्न सिन्हांसोबत अफेअर, पण 7 वर्षातच हे नाते तुटले
'कालीचरण' हा चित्रपट 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आणि ते वर्ष दोन्ही रीना रॉय यांच्यासाठी खूप खास होते. या चित्रपटात त्या त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या शत्रुघ्न सिन्हांसोबत झळकल्या होत्या. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. या दोघांच्या अफेअरची संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा होती. मात्र, 7 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या पण अचानक शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्न केले.

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या आणि रीनाच्या अफेअरची कबूली देताना म्हणाले होते, 'रीनासोबत माझे नाते पर्सनल राहिले आहे. लोक म्हणतात लग्नानंतर माझी फीलींग रीनासाठी बदललली, पण मुळात ती फीलींग वाढली होती. मी खूप लकी आहे की, तिने आयुष्यातील 7 वर्षे मला दिली.'

पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न केले पण 7 वर्षांनी त्याच्यापासून घटस्फोटही घेतला

शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नामुळे रीना रॉय खूप दुखावल्या गेल्या. त्यांनी स्वतःला सावरले आणि 1983 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान यांच्याशी लग्न केले. ज्यावेळी दोघांचे लग्न झाले, त्यावेळी रीना यांचे करिअर यशोशिखरावर होते. लग्नानंतर रीना पतीसोबत पाकिस्तानला गेल्या. काही काळानंतर त्यांची मुलगी सनम हिचा जन्म झाला.

पण मोहसिन खान यांच्यासोबत सात वर्षेच त्यांचा संसार टिकला. 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रीना यांनी मुलाखतीत घटस्फोटाचे कारण सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, की त्या मोहसीन खान यांच्या जीवनशैलीशी स्वतःला जुळवून घेऊ शकल्या नाहीत.

मुलीच्या कस्टडीसाठी करावा लागला संघर्ष
घटस्फोटानंतर रीना रॉय यांच्या मुलीचा ताबा पती मोहसीन खानकडे होता, पण त्यांना मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सनमला परत मिळवण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर शिल्लक सोडली नसल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

रीना रॉय यांना चित्रपटांमध्ये परतायचे आहे
रीना रॉय यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत परतण्याचा निर्णय घेतला पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीसोबत अभिनयाचे क्लासेस चालवायला सुरुवात केली आणि बॉलिवूडपासून दुरावल्या. त्यांचा शेवटचा चित्रपट 2000 मध्ये आलेला 'रिफ्यूजी' आहे. त्यांना आजदेखील चित्रपटांमध्ये परतायचे आहे, पण रीना रॉय कधी आणि कोणत्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत परतणार हे येणारा काळच सांगेल.

बातम्या आणखी आहेत...