आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

64 वर्षांच्या झाल्या रिना रॉय:शत्रुघ्न सिन्हासोबत 7 वर्षे होते रिना रॉयचे अफेअर, दोघांच्या नात्याविषयी शॉट गनच्या पत्नीला सर्वकाही होते ठाऊक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.

बॉलिवूड अभिनेत्री रिना रॉय यांनी आज वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 जानेवारी 1957 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव सायरा अली आहे. 1972 ते 1985 या काळात त्या बॉलिवूडमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. रिना यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये जानी दुश्मन, नागिन, कालीचरण, विश्वनाथ, आशासह अनेक चित्रपट केले. रिना प्रोफशनलपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या. जेव्हा त्या करिअरच्या यशोशिखरावर होत्या, तेव्हा त्यांचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अफेअर सुरु होते. अफेअरविषयी शत्रुघ्न यांच्या पत्नीला होते सर्वकाही ठाऊक

शत्रुघ्न यांनी 9 जुलै 1980 रोजी माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणि (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की रिनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.

बॉलिवूडमध्ये रिना यशोशिखरावर होत्या, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत होते. काही कामानिमित्त रिना लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. रिना यांना या लग्नाविषयी माहित झाल्यानंतर त्या भडकल्या आणि भारतात येऊन याचे उत्तर मागितले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरसुध्दा शत्रुघ्न रिना यांना भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत झाला. दोघांचे नाते का संपुष्टात आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.

एका मासिकाच्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी रिनासोबतच्या नात्याची कबूली देऊन सांगितले होते, 'रिनासोबत माझे नाते पर्सनल आणि इंटेन्स होते. लोक म्हणतात, की लग्नानंतर माझ्या रिनाविषयीच्या भावना बदलल्या. परंतु माझ्या मते त्या वाढल्या आहेत. मी नशीबवान आहे, की तिने तिच्या आयुष्यातील 7 वर्षे मला दिली.'

रिना रॉय यांच्या आईची इच्छा होती, की त्यांच्या मुलीने शत्रुघ्न सिन्हा यांची दुसरी बनावे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, 'मी देवाकडे प्रार्थना करते, की शत्रुघ्न यांनी माझ्या मुलीला दुसरी पत्नी म्हणून स्वीकारावे. ते तिच्यावर प्रेम करत नाहीत, तिला मुर्ख मानतात. मात्र रिनाला वाटत होते, की हे प्रेम आहे. मी तिला सांगितले होते, की ही चूक आहे. परंतु तिने ऐकले नाही.'

एका मुलाखतीत शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांनी सांगितले होते, 'जेव्हा मला दोघांच्या अफेअरविषयी माहित झाले तेव्हा मी त्यांच्या या गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. परंतु शत्रुघ्न यांना अशा मुलीसोबत लग्न करायचे नव्हते, जिच्यावर त्यांना विश्वास नाहीये. मला माहित होते, की दोघांचे लग्नानंतरसुध्दा संबंध होते.'

रिना रॉय यांच्याशी तुलना झाल्याने भडकली होती सोनाक्षी

सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा सोनाक्षीचा चेहरा अभिनेत्री रिना रॉयशी मिळता जुळता आहे, अशी चर्चा रंगू लागली होती. लग्नानंतरही शत्रुघ्न रिना रॉय यांना भेटायचे असे म्हटले गेले होते.

सोनाक्षीचा चेहरा रिना रॉय यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चांनी अडचणी निर्माण झाल्या होत्या. इतकेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानपासून विभक्त झाल्यानंतर मुलगी सनमसोबत राहणा-या रिना रॉय यांच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व वृत्तांचे खंडन केले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रिना यांनी म्हटले होते की, सोनाक्षीचा चेहरा तिची आई पूनम सिन्हाशी मिळता-जुळता आहे. 'दबंग' या सिनेमात सलमान खानने सोनाक्षीला भारतीय लूक दिला होता, त्यामुळे कदाचित तिचा चेहरा माझ्याशी मिळत असावा, असे त्या म्हणाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...