आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाचा तुरुंगातील चौथा दिवस:गेले 3 दिवस रियाने तुरुंगात पंख्याशिवाय काढले, जमिनीवर चटई टाकून झोपावे लागले; आज उच्च न्यायालयात जामिनासाठी करु शकते अर्ज

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोअर कोर्टाकडून रियाचा जामीन अर्ज 4 दिवसांत 2 वेळा फेटाळला गेला.
  • अमली पदार्थांच्या प्रकरणी नार्कोटिक्स ब्युरोने मुंबई-गोवा येथे छापा टाकून 2 जणांना ताब्यात घेतले.

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा तुरुंगात आज चौथा दिवस आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगात तिच्या तीन रात्री पंख्याविना गेल्या. मात्र, रियाला लवकरच टेबल फॅन मिळणार असल्याचे सांगण्यात येत असून कोर्टाने त्यासाठी परवानगी दिली आहे. तिच्या सेलमध्ये पलंग नाही, म्हणून ती जमिनीवर चटई टाकून झोपते. रियाला फक्त ब्लँकेट आणि बेडशीट दिली गेली आहे, मात्र उशी देण्यात आलेली नाही.

  • रियाला हळदीचे दूध दिले गेले

रियाच्या सेलबाहेर, 2 शिपाई 3 शिफ्टमध्ये 24 तास पहारा देत आहेत. कारागृह अधिका-यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्गामुळे कैद्यांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध दिले जात आहे. भायखळा कारागृहात गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे नोंदली गेली आहेत.

  • मुंबई, गोव्यात नार्कोटिक्स ब्युरोच्या छापा, 2 जण ताब्यात

अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या जबाबाच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबई आणि गोवा येथे पाच ठिकाणी छापे टाकून 2 जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाई अजूनही सुरू आहे.

  • रियाने ड्रग्ज एंगलमध्ये 3 बड्या सेलिब्रिटींची नावे घेतली - रिपोर्ट

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील मोठी नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे एनसीबीच्या चौकशीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतल्याचा दावा केला जात आहे. या तिघींना एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता आहे.

  • सुशांतने थायलंड ट्रिपवर 70 लाख रुपये खर्च केले, साराही यात सामील झाली होती- रिपोर्ट

एका अन्य मीडिया रिपोर्टनुसार, रियाने मुकेश छाबरा आणि रोहिणी अय्यर यांचेही नाव घेतले आहे. रियाने एनसीबीला सांगितले की, सुशांत आपल्या मित्रांसह थायलंड ट्रिपवर गेला होता आणि जवळपास 70 लाख रुपये खर्च केले होते. या ट्रिपमध्ये सारा अली खानदेखील सहभागी झाली होती.