आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री रेखा आज 10 अक्टोबरला आपला 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. रेखाने 11 वर्षांची असतानाच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. कारण घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. रेखा यांचा चित्रपटांमधील प्रवास सोपा नव्हता. मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या यशोशिखरावर पोहोचल्या.
रेखा 54 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहेत, पण त्यांच्या चित्रपटांसोबत त्यांचे वयक्तिक आयुष्यही बरेच चर्चेत राहिले. त्यांच्या अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या किस्से तर सामान्य आहेत पण एका गोष्टीचे गूढ अजूनही बाकी आहे, ज्याचे रहस्य कदाचित फक्त रेखा यांनाच माहित असेल.
ऋषी-नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा
रेखा यांच्या भांगातील सिंदूर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याविषयी 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात काही गोष्टी लिहिल्या आहेत. या बायोग्राफीचे लेखक यासर उस्मान यांनी पुस्तकात दावा केला आहे की, रेखा 1980 मध्ये पहिल्यांदा सिंदूर आणि मंगळसूत्र परिधान करून ऋषी कपूर आणि नीतू सिंगच्या लग्नात आल्या होत्या. नीतू आणि रेखा खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
1980 मध्ये नीत यांचे लग्न जेवाह आरके स्टूडियोमध्ये झाले तेव्हा रेखा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तिथे पोहोचल्या त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर पाहून सर्वच हैराण झाले होते. तेव्हा सर्वांनाच माहिती होते की, रेखा विवाहित नाहीत. कॅमेरामनचे कॅमेरेही त्यांच्याकडेच वळले होते. या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि त्यांचे पालकही उपस्थित होते. पुस्तकात दावा केला आहे की, लग्नात रेखाची नजर केवळ अमिताभ बच्चन यांच्यावर होती.
लग्ना सिंदूर लावून पोहोचल्यानंतर मीडियामध्ये अनेक चर्चा झाल्या, मात्र रेखा यांनी मौन सोडले नाही. अनेक वर्षांनंतर त्या याविषयी म्हणाल्या होत्या की, मी लग्नात थेट शूटिंगवरुन पोहोचले होते आणि लोकांच्या रिअॅक्शनची मी चिंता करत नाही. तसे सिंदूर चांगले वाटते, हे मला सूटही करते.
पुस्तकात एक दावा करत लिहिले आहे की, जून 1982 मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार, नॅशनल अवॉर्ड फंक्शनमध्ये जेव्हा रेखा यांना उमराव जान (1981) साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड देण्यात आला तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांनी त्यांना विचारले होते की, तुम्ही भांगेत सिंदूर का भरता? तेव्हा रेखा यांना माइकवर त्यांना उत्तर देताना म्हटले होते की, ज्या शहरातून मी आले आहे, तिथे सिंदूर लावणे फॅशन आहे.
1990 मध्ये केले होते लग्न
1990 मध्ये रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. रेखा आणि मुकेश यांचे फोटो पाहून सर्वांना हेच वाटले की, अखेर रेखाच्या आयुष्यात ज्या प्रेमाची कमतरता होती, ते त्यांना मिळाले. मात्र हे नाते रेखा यांच्या आयुष्यात मोठे वादळ घेऊन आले.
लग्नाच्या आठ महिन्यांच्या आतच मुकेश अग्रवाल यांनी फाशी लावून आत्महत्या केली. त्यावेळी वृत्त होते की, ज्या ओढणीने मुकेश यांनी फाशी घेतली होती की, ती ओढणी रेखा यांची होती. वृत्त होते की, मुकेश डिप्रेशनचा सामना करत होते. मुकेश यांच्या मृत्यूनंतरही रेखा यांनी सिंदूर लावणे बंद केले नाही आणि त्या अजूनही सिंदूर लावत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.