आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत सोहळ्याला चारचाँद लावले. दरम्यान सोशल मीडियावर या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांच्या छायाचित्रांनी लक्ष वेधून घेतले.
आराध्या आणि ऐश्वर्यासोबत दिसली रेखा यांची खास बाँडिंग
अंबानींच्या या सोहळ्याला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती. याबरोबरच ऐश्वर्या राय बच्चन लेक आराध्यासह उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातीबरोबर फोटोसाठी पोझही दिल्या. रेखा यांचे आराध्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्यासोबत रेखा यांची खास बाँडिंग यावेळी पाहायला मिळाली. बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे खास फोटो शेअर केले आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचे रेखा यांचे फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. "रेखा त्यांच्या नातीबरोबर" अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एकाने लिहिले, "ऐश्वर्या आणि आराध्याबरोबर रेखा मॅम" असे म्हटले आहे.
रेखा यांना माँ म्हणते ऐश्वर्या
ऐश्वर्या आणि रेखा यांच्यातील खास बाँडिंग कायमच दिसून येते. रेखा कायम ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसतात. एका अवॉर्ड शोदरम्यान ऐश्वर्या रेखा यांना माँ अशी हाक मारत त्यांच्या पाया पडली होती. खरं तर रेखा तामिळनाडूतील असून ऐश्वर्या मुळची मंगळुरूची आहे. दोन्ही अभिनेत्री दक्षिण भारतातील आहे. दक्षिण भारतात महिलांच्या सन्मानार्थ माँ अशी हाक मारणे सामान्य गोष्ट आहे.
अमिताभ आणि रेखा यांचे नाते
रेखा आणि अमिताभ यांचे नाते जगजाहीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एकेकाळी दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 'सिलसिला' या चित्रपटात ही जोडी अखेरची एकत्र दिसली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.