आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा यांनी जान्हवी कपूरवर केला प्रेमाचा वर्षाव:जान्हवीला बघताच मिठी मारली, 'मिली'च्या स्क्रीनिंगला झाली दोघींची भेट

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट आज (4 नोव्हेंबर) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रिलीजच्या आदल्या दिवशी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या त्यांची मैत्रीण दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवीचे कौतूक करताना दिसल्या. या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रेखा जान्हवीचे मायेने लाड करताना दिसत आहेत. चाहत्यांना दोघींचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...