आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्यामुळे जडले होते दारूचे व्यसन:100 कोटींची मालकीण होती रेखाची सावत्र आई सावित्री, मृत्यूपूर्वी 19 महिने होती कोमात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानटी सावित्री... हे त्या अभिनेत्रीचे नाव आहे जिच्यासमोर साऊथचे मोठमोठे सुपरस्टारही फिके पडायचे. सावित्री या 1960 च्या दशकातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्री होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे 100 कोटींहून अधिक संपत्ती होती. यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो. चेन्नईमध्ये त्यांच्याकडे सर्वात मोठे कार कलेक्शन होते. त्यांच्या बंगल्याबाहेर 10 विंटेज गाड्या उभ्या असायच्या. 30 वर्षांच्या कारकिर्दीत 5 भाषांमध्ये 300 हून अधिक चित्रपट करणा-या सावित्री या तामिळ चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार होत्या.

त्या बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सावत्र आई आणि तामिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन यांच्या दुस-या पत्नी होत्या. मात्र, हे लग्न त्यांच्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी सर्वात घातक ठरले. जेव्हा त्यांचे जेमिनी यांच्याशी लग्न झाले तेव्हा ते आधीच विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. गरिबीतून सुरू झालेले जीवन प्रसिद्धी आणि श्रीमंती या दोन्ही उंचीवर गेले, पण आयुष्याचा शेवट पुन्हा त्याच गरिबीत गेला.

सावित्री यांनी आपल्या छंदासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला. पण शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे काहीच उरले नाही. पतीच्या विश्वासघातामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले. करिअर जवळजवळ बुडाले. 19 महिने कोमात राहिल्यानंतर वयाच्या 46 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी कमी वयातच जगाचा निरोप घेतला. पण आपल्या अभिनय, नृत्याने आणि गायनाने त्यांनी तमिळ चित्रपट इंडस्ट्रीवर एक छाप सोडली ज्याचे प्रत्येक अभिनेत्री स्वप्न बघत असते.

महानटी सावित्री, ज्यांनी आपल्या आयुष्यात इतके चढ-उतार पाहिले की, त्यांच्यावर एक चित्रपटही तयार झाला असून 5 पुस्तकेही लिहिली गेली आहेत. आजच्या न ऐकलेल्या किश्श्यांमध्ये जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयी...

6 महिन्यांची असताना वडिलांना गमावले
निस्सानकारा सावित्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1935 रोजी गुंटूर जिल्ह्यातील चिरावुरु गावात झाला. सावित्री यांचे वडील निशांकरा गौरव यांचे त्या अवघ्या सहा महिन्यांच्या असातना निधन झाले. जगण्याचा कोणताही मार्ग नसताना, असहाय्य आई सुभद्राम्मा 6 महिन्यांची सावित्री आणि मोठा मुलगा मारुती यांना घेऊन विजयवाडा येथील बहीण दुर्गंबा आणि त्यांच्या पतीच्या घरी आश्रय घेण्यासाठी पोहोचल्या.

सावित्रीचे काका कोम्मा रेड्डी व्यंकटरमैय्या चौधरी हे एक वाहनचालक होते. कुटुंबाची जबाबदारी उचलून त्यांनी मुलांना शाळेत दाखल करून घेतले. सावित्री यांना नृत्याची आवड लहानपणापासूनच होती. त्यांची कला ओळखून काकांनी त्यांना नृत्याचे प्रशिक्षण दिले. जेव्हा लोक लहान सावित्रीला वडील नसल्यामुळे त्रास देत असत, तेव्हा त्यांच्या काकांनी त्यांना अप्पा (वडील) म्हणण्याचा अधिकार दिला होता.

स्टुडिओच्या फे-या मारल्या, पण हाती आली निराशा
सावित्री यांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर नाटकात स्थान मिळाले. एकदा त्यांना त्यांच्या काळातील दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. सन्मान म्हणून म्हणून पृथ्वीराज यांनी त्यांना बक्षीस दिले होते.

12 वर्षांच्या सावित्रीची प्रतिभा ओळखून त्यांच्या काकांनी त्यांना चेन्नईच्या विजया वहिनी स्टुडिओत नेले, जेणेकरून चित्रपटात काम मिळेल. पण स्टुडिओवाल्यांनी त्यांना काम दिले नाही. सावित्री यांचे कमी वय हे वारंवार मिळणा-या नकाराचे कारण होते. कंटाळलेल्या काकांनी सावित्रीला स्वतःचे वय 12 नव्हे तर 15 वर्षे सांगायला लावले. पण त्याचाही उपयोग झाला नाही.

पहिल्या चित्रपटात एकही संवाद बोलू शकल्या नाहीत
काकांनी हार मानली नाही आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्टुडिओत घेऊन जाऊ लागले. 1948 मध्ये एका स्टुडिओने सावित्रीला काम दिले, पण जेव्हा त्यांना हिरोसमोर संवाद बोलण्यास सांगितले गेले तेव्हा त्या लाजेने आणि संकोचने बोलू शकल्या नाहीत.

दरम्यान, त्या काळातील स्ट्रगलिंग तामिळ अभिनेता जेमिनी गणेशन यांनी सावित्री यांचे एक छायाचित्र काढले. आणि काकांना सांगितले की, 2 महिन्यांनी पुन्हा सावित्रीसोबत या. सावित्री काकासोबत गावी परतल्या.

जेमिनी गणेशन यांनी काढलेल्या छायाचित्रामुळे मिळाला पहिला चित्रपट

जेमिनी गणेशन यांनी सावित्रीचा जो फोटो काढला होता, तो एका मासिकात प्रसिद्ध झाला होता. तो फोटो पाहून साधना स्टुडिओने त्यांना त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका देण्याचे ठरवले. एके दिवशी एक अज्ञात व्यक्ती सावित्रीच्या घरी पोहोचली, ज्याने तिला नायिका बनण्याची ऑफर दिली. सावित्री यांनी होकार दिला आणि इथून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.

पहिल्या चित्रपटात त्या फक्त हिरोकडे पाहत राहिल्या, नंतर चित्रपटातून काढून टाकण्यात आले

सावित्री यांना 1950 मध्ये आलेल्या 'समसाराम' या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली, ज्यामध्ये तत्कालीन स्टार एनटी रामाराव मुख्य भूमिकेत होते. अवघ्या 15 वर्षांची सावित्री या भूमिकेसाठी इतकी उत्सुक होती की, तिच्यावर चित्रित केलेली सर्व दृश्ये पुन्हा पुन्हा शूट करावी लागली.

सावित्री यांचे लक्ष चित्रपटापेक्षा एनटी रामाराव यांच्यावर जास्त होते. शूटिंग खराब होत राहिले आणि दिग्दर्शकाचा रागाचा पारा चढला. सावित्रीवर नाराज झालेल्या दिग्दर्शकाने अखेर त्यांना चित्रपटातून काढून टाकले.

पुढे, सावित्री यांना रूपवती, पाताल भैरवी अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. प्रदीर्घ संघर्षानंतर सावित्री यांना बेली चिझी चुडूमध्ये मोठा ब्रेक मिळाला. 1952 मध्ये आलेल्या या चित्रपटातून सावित्री यांना ओळख मिळाली आणि नंतर देवदासू आणि मिसम्मा या चित्रपटातून त्यांनी स्टारडमचा आनंद लुटला.

एकत्र काम करताना विवाहित जेमिनीच्या प्रेमात पडल्या
सावित्री यांना तत्कालीन स्टार जेमिनी गणेशन यांच्यासोबत मनम पोला मंगल्यममध्ये काम मिळाले. एकत्र काम करत असताना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. जेमिनी विवाहित असल्याचे सावित्री यांना माहीत होते, तरीही त्यांनी त्यांचे नाते चालू ठेवले. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

विवाहित जेमिनीशी लग्न केल्यावर काकांनी त्यांचे नाते तोडले

सावित्री आणि जेमिनी 1952 मध्ये विवाहबद्ध झाले. या लग्नामुळे सावित्री यांचे काका खूप रागावले होते, कारण जेमिनी विवाहित आणि 4 मुलांचा वडील होते. तर सावित्री यांचे करिअर यशोशिखरावर होते. लग्न आणि 4 मुलांव्यतिरिक्त, अभिनेत्री रेखाची आई असलेल्या अभिनेत्री पुष्पावलीसोबतही जेमिनी यांचे अफेअर होते.

ज्या काकांनी सावित्रीला नायिका बनवले, सावित्रीने फक्त आपल्या प्रेमासाठी त्यांच्यासोबतचे नाते तोडले. कारकिर्दीमुळे आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे जेमिनी आणि सावित्री यांनी त्यांचे लग्न गुपित ठेवले होते.

एका सहीमुळे झाला होता लग्नाचा खुलासा
चित्रपटांतून सावित्री लोकप्रिय झाल्या. एके दिवशी लक्स अॅड फिल्मचा कॉन्ट्रॅक्ट साइन करताना सावित्री यांनी त्यांचे नाव सावित्री गणेशन असे लिहिले. लोकांचे लक्ष त्यांच्या बदललेल्या नावाकडे जाताच दोघांचे लग्न झाल्याची पुष्टी झाली.

गुपचूप लग्नापेक्षाही मोठी बातमी म्हणजे विवाहित गणेशन यांचे त्यावेळी अभिनेत्री पुष्पवल्लीसोबत अफेअर होते. तरीही त्यांनी सावित्रीसोबत दुसरा विवाह केला होता. काही काळानंतर पुष्पावली सोबतच्या अफेअरमधून गणेशन यांना रेखा (अभिनेत्री) आणि राधा या दोन मुली झाल्या. गणेशन यांना सावित्रीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सावित्री या दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्री होत्या
वैवाहिक आयुष्यात आलेल्या चढउतारांनंतरही सावित्री यांनी तामिळ चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. 1957 मध्ये आलेल्या मायाबाजार चित्रपटातील सावित्रीच्या दमदार अभिनयामुळे त्या तामिळमधील सर्वोत्कृष्ट नायिका बनल्या. 50 च्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणा-या त्या अभिनेत्री होत्या. सावित्री यांच्यासमोर अभिनय करण्यासाठी नायकही घाबरत असत. सावित्री यांना जो दर्जा मिळाला, तो त्याकाळी कोणत्याही दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाला नव्हता. त्यांचे सौंदर्य, अभिनय आणि राहणीमान या सर्व गोष्टींनी लोकांना आकर्षित केले.

महागडे दागिने, आलिशान गाड्या आणि 100 कोटींची मालमत्ता
1958 मध्ये सावित्री यांनी टी नगर, मद्रास येथे त्यांचे आलिशान राजवाड्यासारखे घर बांधले. सावित्री यांची बायोपिक महानटीनुसार जेव्हा सावित्री यांनी गृहप्रवेश केला, तेव्हा पाहुण्यांना चांदीच्या ताटात जेवण दिले गेले. एका छोट्या गावात जन्मलेल्या सावित्री यांचा छंद राजामहाराजांसारखा होता. शहरात प्रत्येक सुखसोयींनी भरलेले घर आणि घराबाहेर आलिशान वाहनांचा ताफा. या ताफ्यात 10 मोठी वाहने होती.

सावित्री यांच्याकडे चेन्नईत विंटेज कारचे सर्वात मोठे कलेक्शन होते.
सावित्री यांच्याकडे चेन्नईत विंटेज कारचे सर्वात मोठे कलेक्शन होते.

सावित्री यांना केवळ गाड्या खरेदी करण्याची आवड नव्हती तर ती चालवण्याचीही त्यांना आवड होती. कार रेसिंग पाहण्याची आवड असलेल्या सावित्री एक प्रोफेशनल कार रेसर होत्या, ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. 60 च्या दशकात सावित्री यांच्याकडे 100 कोटी रुपयांची संपत्ती होती. मौल्यवान सोन्याचे दागिने खरेदी करणे हा त्यांचा सर्वात मोठा छंद होता.

घरात एक सोनार नेहमी हजर असायचा
ज्या दिवशी त्या शूटिंगला जात नसत, त्या दिवशी त्यांच्या घरी सोनार त्यांचे दागिने डिझाइन करण्यासाठी हजर असायचा. त्यांच्याकडे इतके दागिने होते की, त्या चित्रपटात दागिने घालूनच दिसायच्या.

महानटीला सोन्याच्या दागिन्यांची इतकी आवड होती की त्या घरातही भरपूर दागिने घालायच्या.
महानटीला सोन्याच्या दागिन्यांची इतकी आवड होती की त्या घरातही भरपूर दागिने घालायच्या.

चाहते महिनोनमहिने घराबाहेर थांबायचे
सावित्री यांची एक झलक बघण्यासाठी त्यांच्या घराबाहेर हजारो लोक जमत असत. एक झलक बघण्यासाठी ते अनेक महिने तिथे राहायचे. सावित्री यांनी गरजू मुलांसाठी शाळा बांधल्या, जेवण दिले आणि लोकांना मदत होईल असे सर्व काही केले.

घरी कोणी मदत मागायला आले तर त्या मोकळ्या हाताने मदत करायच्या

महानटीचे घर गरजूंसाठी सदैव खुले असायचे. सावित्री यांच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परतली नाही. एकदा गायिका सुशीला ज्येष्ठ अभिनेत्यांच्या मदतीसाठी देणगी गोळा करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. हे ऐकून सावित्री यांनी लगेच पर्स उघडली आणि न मोजता त्यातील सर्व पैसे काढून सुशीला यांच्याकडे दिले. ते 15 हजार रुपये होते, जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती.

सावित्री यांच्या सिल्क साडीचे कुणी कौतुक केले तर त्या ती साडी गिफ्ट करायच्या.
सावित्री यांच्या सिल्क साडीचे कुणी कौतुक केले तर त्या ती साडी गिफ्ट करायच्या.

पैशांअभावी अभ्यास करु न शकणा-या मुलांना त्या पैसे देत. चित्रपटात कामाच्या शोधात आलेल्या मुलींना एकतर काम मिळवून द्यायच्या किंवा त्यांना समजावून पैसे देऊन परत पाठवायच्या.

लग्नाचे निमंत्रण घेऊन कोणी आले तर सावित्री आपले मौल्यवान दागिने काढून देत असत.. जेमिनी यांची पहिली पत्नी अलमेलू हिच्याशीही सावित्री यांचे चांगले संबंध होते. सावित्री त्यांना आपली मोठी बहीण मानत होत्या.

दिग्दर्शक नाग अश्विनने द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते – ज्या काळात नायकाला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवले जात होते, त्या काळात दिग्दर्शक सावित्री यांच्या तारखा घेण्यासाठी त्यांचे संपूर्ण शूट पुढे-मागे करत असत.

लोकप्रियता आणि लग्झरी आयुष्य बघून पती जेमिनी यांनाही वाटायचा हेवा
पती जेमिनी गणेशन सावित्री यांच्या यशावर खूश नव्हते. अनेकवेळा असे घडले की, जेव्हा दिग्दर्शक घरी यायचे तेव्हा जेमिनी यांना वाटायचे की ते त्यांना साइन करायला आले, पण प्रत्यक्षात ते सावित्रीसाठी यायचे. एकीकडे वर्तमानपत्रांमध्ये सावित्री यांच्या यशाच्या बातम्या येत असताना दुसरीकडे जेमिनी यांच्या फ्लॉप चित्रपटांची खिल्ली उडवली गेली.

सावित्री उधळपट्टी करून लोकांवर खर्च करायच्या. त्यांनी कधीही आपल्या खर्चाचा आणि कमाईचा हिशोब ठेवला नाही, परंतु त्यांच्याशी संबंधित काही लोकांनी याचा फायदा घेतला. यामध्ये पती जेमिनी गणेशन यांचाही समावेश होता.

जेव्हा जेमिनी यांनी सावित्रीच्या खर्चावर मर्यादा घालण्यास सुरुवात केली तेव्हा काही काळातच त्यांच्यात मतभेद झाले. सावित्री यांच्या चित्रपटांची लोकप्रियता एवढी वाढू लागली की, जेमिनी गणेशन यांना सावित्री यांचे पती म्हणून ओळखले जाऊ लागले. पण खरं तर जेमिनी स्वतः एक स्टार होते.

पतीने लावले दारूचे व्यसन
बायोपिक आणि इंडस्ट्रीशी संबंधित जुन्या लोकांच्या मते, जेमिनी गणेशन स्वतः सावित्री यांना दारू प्यायला लावत असत. दुसरीकडे, पतीच्या विश्वासघातामुळे नाराज होऊन सावित्री यांनी दारू पिण्यास सुरुवात केली, असे काहींचे मत आहे.

पतीपासून अंतर वाढल्यावर सावित्री दारूच्या नशेत बुडाल्या
जेमिनी गणेशन आणि सावित्री यांच्यात अंतर वाढू लागले. संवाद थांबला आणि त्यांचे नाते फक्त घरात एकत्र राहण्यापुरते मर्यादित झाले. महानटी सावित्री: वेंटी तेरा सामरागिनीमध्ये लेखिका पल्लवीने लिहिले की, सावित्री त्यांच्या पतीच्या अफेअरमुळे आणि विश्वासघातामुळे कोलमडल्या होत्या.

एक वेळ अशीही आली जेव्हा सावित्री चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान सेटवर खुलेआम दारू पिऊ लागल्या. एकदा मद्यधुंद अवस्थेत सावित्री यांनी पी.सी. रेड्डी यांच्यावर दारू ओतली. एका मुलाखतीदरम्यान पी. सी. रेड्डी यांनी सांगितले की, सावित्री यांनी माझ्यावर दारू फेकल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी नवीन शर्ट आणला होता.

चित्रपटात गुंतवलेला पैसा बुडाला
सावित्री यांच्या खर्चिक स्वभावाचा फायदा अनेकांनी घेतला. त्यांना दिग्दर्शनाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून चित्रपटात पैसे गुंतवले जायचे. सावित्री यांनी 1968 मध्ये चिन्नारी पापलु या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या चित्रपटासाठी सावित्री यांना नंदी पुरस्कार नक्कीच मिळाला, पण चित्रपट कमाई करू शकला नाही. तसेच सावित्री यांच्या अनेक चित्रपटांचे नुकसान झाले. जेव्हा पार्टनरने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला तेव्हा स्वाभिमानी सावित्री यांनी स्वतः सर्व पैसे गुंतवून भरपाई केली होती. सततच्या तोट्यामुळे सावित्री यांची संपूर्ण बचत संपुष्टात येऊ लागली.

पतीचे आयुष्यातून दूर जाणे आणि आईचे निधन सहन करु शकल्या नाहीत सावित्री
1969 मध्ये जेमिनी गणेशन पत्नी सावित्रीला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहू लागले. यानंतर अवघ्या वर्षभरात सावित्री यांच्या आईचे निधन झाले. यामुळे सावित्री खूप खचल्या आणि दिवसरात्र दारूच्या नशेत राहू लागल्या. घेतलेले कर्ज फेडले नाही. कर वेळेवर भरला नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय त्यांना उद्धवस्त करत होता. संकट असे आले की सावित्री यांना एक एक करून आपली मालमत्ता विकावी लागली.

घरावर पडले इन्कम टॅक्सचे छापे, मालमत्ता जप्त

60 च्या दशकाच्या उत्तरार्धात सावित्री यांच्या घरावर आयकरचा छापा पडला होता. विभागाने सावित्री यांची सर्व मालमत्ता जप्त केली. सावित्री यांना या कायदेशीर पेचातून मार्ग दाखवणारा कोणी सल्लागार नव्हता. हळूहळू कमावलेला पैसा सगळा दारूत तर कधी चित्रपटात बुडला. चित्रपटांचे नुकसान भरून काढण्यासाठी वितरक घरी येऊन गोंधळ घालू लागले. नुकसान भरून काढण्यासाठी सावित्री यांनी त्यांची उरलेली मालमत्ताही विकली. टी नगरमधील आलिशान घर सोडून सावित्री अण्णा नगरमधील एका छोट्याशा घरात आल्या आणि एकट्याच राहू लागल्या.

वाढते आजार आणि कमी होणारे वजन
एकटे राहून सावित्री यांनी स्वतःकडे लक्ष देणे बंद केले. वजनही कमी होत होते. एके दिवशी सावित्री यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले तिथे त्यांना हाय शुगर आणि बीपीचा त्रास असल्याचे समोर आले. या अवस्थेतही त्यांनी दारू पिणे सुरू ठेवल्यास त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही सावित्री यांनी दारू पिणे सुरूच ठेवले.

घर चालवण्यासाठी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या
पैसे कमावण्यासाठी सावित्री चित्रपटात काम करत राहिल्या. दासारी नारायण राव यांनी सावित्री यांच्या वाईट काळात त्यांना खूप मदत केली आणि बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांना काम दिले. आलिशान वाहनांतून प्रवास करणा-या सावित्री वाईट काळात रिक्षाने सेटवर पोहोचायच्या.

कोर्टाचा दंड भरायलाही पैसे नव्हते
प्राप्तिकर विभाग सावित्री यांच्यावर 2 लाखांचा दंड भरण्यासाठी सतत दबाव आणत होता, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. सावित्री यांनी ज्यांना मदत केली, ज्यांना सोन्याचे दागिने दिले त्या सर्व लोकांकडे मदत मागितली, पण कोणीही त्यांना साथ दिली नाही.

सावित्री 19 महिने कोमात होत्या
एकटे राहून सावित्री यांची प्रकृती अधिकच खालावत गेली होती. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे 1980 मध्ये सावित्री कोमात गेल्या. 19 महिने त्या कोमात राहिल्या आणि पुन्हा कधीच उठल्या नाहीत. शेवटच्या काळात सावित्री यांचे पती जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या उपचारात मदत केली आणि त्यांच्यासोबत राहिले. सावित्री यांच्या काकानेही त्यांची शेवटच्या काळात खूप काळजी घेतली.

जेमिनी गणेशन यांच्या पहिल्या पत्नी अलामेलू यांच्या सांगण्यावरून जेमिनी यांनी सावित्री यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरातून काढली होती.
जेमिनी गणेशन यांच्या पहिल्या पत्नी अलामेलू यांच्या सांगण्यावरून जेमिनी यांनी सावित्री यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरातून काढली होती.

छोट्या घरात सावित्री यांना बघून खूप वेदना झाल्या होत्या : कमल हासन
जयप्रधाम या टीव्ही शोमध्ये कमल हासन यांनी सावित्री यांच्या चांगल्या आणि वाईट काळाशी संबंधित गोष्टी सांगितल्या होत्या. ते म्हणाले- मी त्यांच्याकडूनच मांसाहारी जेवण बनवायला शिकलो. गाडी चालवण्याच्या आणि पान चघळण्याच्या शैलीमुळे सावित्री अम्मा कायम चर्चेत असायच्या. अनेक किलोमीटरचा प्रवास करून त्यांना समाधान मिळत असे. टॅक्सीची वाट पाहत उभी असतानाही मी त्यांना पाहिले आहे. वाईट काळातही त्यांचा स्वाभिमान कमी झाला नव्हता. त्यांच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा राजवाड्यातील राणीला एका छोट्याशा घरात पाहून मला अश्रू अनावर झाले होते.

  • 5 लग्ने करूनही मीना शौरींचा नशीबी एकाकीपणा:पाकिस्तानात स्थायिक होण्यासाठी नव-याला सोडले, गोळा केलेल्या पैशांतून झाला अंत्यसंस्कार

मीना शौरी यांनी एकुण 5 लग्ने केली, पण एकही लग्न फार काळ टिकले नाही. त्यांचे 3 विवाह भारतात आणि 2 पाकिस्तानात झाले. 1956 मध्ये त्या त्यांच्या तिसऱ्या पतीसोबत एका चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानात गेल्या आणि मग तेथून परतल्या नाहीत. त्यांचा नवरा मात्र भारतात परतला. या नवऱ्यासाठी त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. पण पाकिस्तानात स्थायिक होण्यासाठी पुन्हा त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. पाकिस्तानातही दोन लग्ने झाली, पण तीही अयशस्वी ठरली. खुर्शीद उर्फ मीना यांना पाकिस्तानची लक्स गर्ल असेही संबोधले जात होते. पण पाकिस्तानातील त्यांचे आयुष्य सोपे नव्हते आणि मृत्यू त्याहून वाईट होता.

जाणून घेऊया मीना शौरींची कहाणी...

  • चीनने गद्दार ठरवून हकललेली अभिनेत्री:व्हिसा न मिळाल्याने घटस्फोट, 4 लाख सेक्स स्लेव्ससाठी जपान सरकारला झुकवले

योशिको यामागुची... चीन आणि जपान या दोन्ही देशांत ती आघाडीची अभिनेत्री होती, पण तिचे आयुष्य एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हते. दुसऱ्या महायुद्धात, जेव्हा चीन आणि जपान एकमेकांचे कट्टर शत्रू होते, तेव्हा ती चीनमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी ती मूळची जपानी असल्याचे फार कमी लोकांना माहीत होते. चीन सरकारला याची माहिती मिळताच तिला अटक करण्यात आली. नऊ महिने तुरुंगात ठेवले. त्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कशीतरी फाशीची शिक्षा रद्द झाली, परंतु चीनने तिला देशातून हाकलून दिले.

अभिनेत्री योशिको यामागुचीची कहाणी जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...